यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील कार्यकारी सहकारी संस्था ची अविरोध अध्यक्ष उपाध्यक्ष निवड

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

सावळी सदोबा येथील कार्यकारी सहकारी संस्था ची अविरोध अध्यक्ष उपाध्यक्ष निवड

सावळी (सदोबा) आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित निवड प्रक्रिया सुरू झाली होती.सावळी सदोबा सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन अविरोध संचालक मंडळ निवड करण्यात आले तसेच अध्यक्ष/उपाध्यक्ष ची निवड प्रक्रिया अविरोध करण्यात आली, यावेळी उपस्थित सावळी सर्कल मधील नेते, बाळासाहेब शिंदे, डॉ .रामचरण चव्हाण,प्रकाशभाऊ राठोड.नुरसींग राठोड,नुनेश्र्वर आडे.अहेमद तंवर.विजय पाटील भगत.यांनी प्रयत्न करुन सावळी सदोबा संस्था ची निवड प्रक्रिया अविरोध करण्यात आले.अध्यक्ष अंबादास जाधव तर उपाध्यक्ष धिरज पिसे.आणी संचालक मंडळ शंकर लाला जाधव.उंदल फुलसींग जाधव.तारासींग सर्व चव्हाण, रमेश राठोड.वासुदेव जाधव, मधुकर वाघमारे.दिलीप मोरपाके.संघमित्रा विजय भगत.राजु सर्वे.श्रीमती खरात बाई.सर्व संचालक मंडळ अविरोध निवड प्रक्रिया पूर्ण झाली.संस्थेचे सचिव नितेश चव्हाण यांनी निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सांगितले.

Copyright ©