यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील व्यापारी बांधवाकडून नागरिकांसाठी पोणपोई

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

सावळी सदोबा येथील व्यापारी बांधवाकडून नागरिकांसाठी पोणपोई

(परिसर स्वच्छ करून पाणपोई उद्घाटन करण्यात आलेत)
सावळी सदोबा:-आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा ही ४२ गावांची सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते,या बाजारपेठेतील काही व्यापारी बांधवाकडून “सामाजिक उपक्रम” म्हणून सावळी सदोबा येथील बाजारपेठेमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले,ऊन्हामध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकासाठी पिण्याच्या पाण्याकरिता पाणपोईची स्थापना करण्यात आली,सध्या उन्हाचा तडाखा दिवसभरजाणवतअसल्याने,ऊन्हामध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचा जिव कासावीस होतो,त्यामुळे सामाजिक कार्याचे भान ठेवून बाजारपेठेमध्ये नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकीतुन नागरिकांना थंडगार पाणी मिळावे या हेतुने खालील व्यापारी बांधवांकडून कुमरे इंडियन गॅस एजन्सी,कास्तकार एजन्सी,बालाजी ऑटोमोबाइल,या व्यापारी वर्गाकडून सावळी सदोबा येथे पाणपोई ची स्थापना करण्यात आली,दररोज दोन ते तीन हजार लिटर पाणी वाटप करण्यात येत आहे,सावळी सदोबा येथे पाणपोई मागील वर्षीपासून चालू असून, परिसरातील नागरीकांकडुन पाणपोई स्थापन करणाऱ्या व्यापारी बांधवाचे कौतुक केले जात आहे.

Copyright ©