यवतमाळ सामाजिक

शुभम – साई ची बँक कृषी अधिकारी म्हणून निवड”

सहसंपादक गोकुल खडसे

शुभम – साई ची बँक कृषी अधिकारी म्हणून निवड”

आयबीपीएस द्वारे दरवर्षी बँक कृषी अधिकारी पदाची परीक्षा पार पाडली जाते.डिसेंबर महिन्यात २०२१ ला पूर्व परीक्षा पार पडली.मग मुख्य परीक्षा आणि नंतर तोंडी परीक्षा.अशा तीन टप्प्यात ही परीक्षा पार पडली.आणि या परीक्षेचा निकाल १ एप्रिल ला जाहीर झाला.या परीक्षेत शुभम मुर्लीधर काळे याला ला १०० पैकी ६७ गुण मिळाले.शुभम तसा आजीकडे हिंगोली ला राहतो.जेमतेम परिस्थिती.
घरी जमिनीच खांड नाही.भूमीहीन.सर्व सांभाळ त्याचा आजीकडे झाला.आजीने शैक्षणिक खर्च उचलत त्याच कृषी पदवीपर्यंतच सर्व शिक्षण पूर्ण केलंय.सध्या शुभम नौकरी ला लागलाय. बँक कृषी अधिकारी म्हणून कॅनरा बँकेत.दुसरा विद्यार्थी साई मधूकरजी मासटवार याला १०० पैकी ६५ गुण मिळालेत.साई तसा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील झरी तालुक्यातील एका ग्रामीण भागातील.सर्व काही शेतीवर निर्भर.आई बाबांचं स्वप्न साई ने पूर्ण केलंय.साई त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील पहिला व्यक्ती आहे की जो सरकारी नौकरी वर येत्या काळात रुजू होतोय. त्याची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये बँक कृषी अधिकारी म्हणून नियुक्ती झालीय.साई आणि शुभम ने आपल्या यशाचं संपूर्ण श्रेय आपले आई वडील,आजी व कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था द्वारा संचालित संपूर्ण रॅक परिवार यवतमाळ चे संस्थापक अध्यक्ष प्रा.पंढरी दत्तराव पाठे यांना दिलंय.सदर छायाचित्रांमध्ये संस्थेचे अध्यक्ष प्रा.पंढरी दत्तराव पाठे यांच्यासोबत बँक कृषी अधिकारी शुभम काळे आणि साई मासटवार.
कृषी ज्ञानदा बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था द्वारा संचालित संपूर्ण रॅक परिवार यवतमाळ ही संस्था गेल्या ६ वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील गरजू कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी काम करतेय.

Copyright ©