यवतमाळ सामाजिक

आंबा वृक्षाची तस्करी करणारे वनविभागाच्या जाळ्यात

आंबा वृक्षाची तस्करी करणारे वनविभागाच्या जाळ्यात

दि. 01 एप्रिल रोजी गुप्त माहिती मिळाल्यावरून अकोला बाजार ते सावळी रस्त्यावर ट्रक क्र. MH 26 H 8575 ची तपासणी केली असता आंबा प्रजातीचे वृक्षाची बिनापरवाना वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. त्यावरून ट्रकचालक म.मईम म. खलील श. पुसद, क्रेनचालक शेख ईसार शेख ईमाम श. पुसद, लाकुड ठेकेदार शेख शेख्या शेख मुस्तफा श. पुसद यांना चौकशीत आढळल्याने कारवाई करण्यात आली सदर प्रकरणात आंबालाकडाने भरलेला ट्रक क्र. MH 26 H8575, व
क्रेन क्र.APOLAG 8775, व दोन पेट्रोल चलील पावर सॉ कटर मशीन जप्त करण्यात आले असून भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 41, 1,42 खननियमावली 2014 चे कलम अगु
अन्वये कार्यवाही करून वनगुन्यक्र, 6921/123010 दि. 01/एप्रिल/2022 नुसार जारी करण्यात आला. सदर कार्यवाही आनंद रेड्डी येल्लू उपवनसंरक्षक यवतमाळ यांचे मार्गदर्शनात प्रशांत बहादुरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिवरी, चेतन नेवारे 1 वनपरिक्षेत्र अधिकारी, फिरते पथक यवतमाळ व हिवरी रेंज आपल्या चमू समवेत कारवाईत सहभागी होते .या प्रकरणात आणखी काही धागे दोरे सापडणार का या अनुषंगाने चौकशी करण्यात येत आहे

Copyright ©