यवतमाळ सामाजिक

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड येथे सत्कार

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड येथे सत्कार

करताना भाजप नेत्या सौ.संध्याताई प्रफुल्ल राठोड माजी मंत्री कै.गंगाधरराव देशमुख कुंटुरकर यांच्या कुंटूर तालुका नायगाव येथील स्मारकाचे लोकार्पण राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड येथे आले असता त्यांचा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या सौ. संध्याताई राठोड यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. या सत्कार कार्यक्रम प्रसंगी लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजप नेते प्रफुल्ल राठोड आदींची उपस्थिती होती स्वर्गीय गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर माहूर येथे रेणुकादेवीचे दर्शन घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघाले त्यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते व भाजप नेत्या सौ संध्याताई राठोड या उपस्थित होत्या.

Copyright ©