यवतमाळ शैक्षणिक

माळेगांव जि.प शाळेत पोषण आहार वाटप

सावळी सदोबा आशिफ खान

माळेगांव जि.प शाळेत पोषण आहार वाटप

आर्णि पंचायत समिती अंतर्गत असलेल्या मौजा मालेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले, यावेळी ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२२ अखेर १५४ दिवसांच्या शालेय पोषण आहाराचे १५०विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेत या पोषण आहारात तांदूळ, मुंग डाळ,हरभरा यांचा समावेश होता, याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोद पवार उपाध्यक्ष अरविंद पवार सह शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी उपस्थिती मध्ये शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले, पोषण आहार घेण्यासाठी आलेल्या पालकांना आपल्या आपल्या नियमित शाळेत पाठवण्याच्या सुचना देऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक सुनील राठोड ,वानखडे रवि राठोड सर, डाखोरे यांनी परिश्रम घेतले

Copyright ©