यवतमाळ सामाजिक

श्री हर हर महादेव दुर्गामाता संस्थान संभाजी नगर दिग्रस येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन

श्री हर हर महादेव दुर्गामाता संस्थान संभाजी नगर दिग्रस येथे अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन

दिग्रस येथील संभाजी नगर मध्ये
श्री हर हर महादेव दुर्गामाता संस्थान च्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन करून चैत्र नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. शनिवार दिनांक २/४/२०२२ ते शनिवार दिनांक ९/४/२०२२ पर्यंत रोज सकाळी ६ ते ७ या वेळेत ह.भ.प गावंडे महाराज व ह.भ.प भोयर महाराज यांच्या नेतृत्वात संभाजी नगर परिसरात भक्तिमय काकड सकाळी ९ ते ११ या वेळेत देवी महात्म्य पारायण ह.भ.प,निलेश महाराज गावंडे यांच्या रसाळ वाणीतून ,रोज सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हरिपाठ, सायंकाळी ७ ते ८ भारुड, रोज सायंकाळी ८ ते १० या वेळात महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन रोज दुपारी २ ते ५ या वेळेत
संगीतमय प्रभु श्री राम कथा ह.भ.प.अनुपमाजी पिंपळकर यांच्या रसाळ वाणीतून , शुक्रवार दिनांक ८/४/२०२२ ला रात्री ११ ते 12 या वेळेत होम हवन पूजन करून शनिवार दिनांक ९/४/२०२२ दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होईल .दिग्रस शहरा सह तालुक्यातील भाविकांची लाभ घ्यावा असे आवाहन श्री हर हर महादेव दुर्गामाता संस्थान च्या वतीने करण्यात आले आहे

Copyright ©