यवतमाळ सामाजिक

नाकापार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर संपन्न

नाकापार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबीर संपन्न

विद्या प्रसारक मंडळ, यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर ग्राम नाकापार्डी ता.जि. यवतमाळ येथे एकतीस मार्चला संपन्न झाले.
दिनांक पंचवीस मार्चला प्राचार्य डॉ.पवन मांडवकर यांचे शुभहस्ते उद्घाटन पार पडले. बौद्धिक सत्रामध्ये हरिश्चंद्र राठोड व सहकारी यांचे आपत्ती व्यवस्थापन, अॅड. अमित बदनोरे व अॅड . महेंद्र ठाकरे व अॅड विजय गुप्ता ‘ संविधान घरोघरी ‘ , अविनाश सूर्यवंशी, कल्याण बेदरकार, प्रफुल्ल मनवर, पांडुरंग राऊत व अकबरभाऊ बुधवानी यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या विविध योजना, डॉ. मौसमी वराडे व डॉ. तारक यांनी ‘स्त्रियांचे आरोग्य समस्या व उपाय’, नागेश जायले ‘ वाहतूक नियमावली सावधगिरी ‘, डॉ. अजय लाड यांनी ‘ समाजाभिमुख रासेयो- ‘, शितोळे यांचेतर्फे ‘ करिअर कट्टा ‘ डॉ. गड्डमवार ‘ भारतीय शेती व नियोजन ‘ यावर संशोधनपूर्ण मार्गदर्शन, महिला मेळावा, रक्तदान शिबीर, योगा व ध्यान, सामुदायिक प्रार्थना, प्रभातफेरी, पथनाट्ये, श्रमदान, ग्रामसफाई, शोषखड्डे तसेच प्रबोधन कार्यक्रमात श्याम वानखडे, मंगरूळपीर , सप्त खंजेरी वादक संदीपपाल महाराज, अंजनगाव सूर्जी, ह.भ.प. , बालब्रम्हचारी अनिकेत कडू महाराज, शैलेश राणे, संजय किनाके याचे भारूड, श्री गुरुदेव सेवा मंडळ, मानवता मंदिर, यवतमाळ यांचे प्रबोधनात्मक भजन अशोक गेडाम ,तुकाराम राऊत, रामदास घंगाळे, नामदेव राजुरकर, रेणूराव सालोडकर, राठोड , डॉ. तारक, अविनाश गावंडे ( हिवरी ), राठोड, चौधरी लोणी, संदिप उपरीकर, सुरेश सिडाम, प्रकाश बोरखडे, दामोदर धुर्वे यांचा सहभाग होता.
प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा , कुणाल झाल्टे तहसीलदार, किशोर जुनघरे ठाणेदार , पवन राठोड, सहा. पोलीस निरीक्षक , प्रेम धुर्वे सरपंच, प्रतीक्षाताई दिनकर भवरे उपसरपंच समारोपीय कार्यक्रमात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचे व गावकऱ्यांचे मनोगत झाले. डॉ.माधुरी भादे यांनी प्रास्ताविक व प्रा. सचिन वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले.निखिल बोरखडे, पंकज तिवारी, अॅड. विजय गुप्ता, दिनकर भवरे, अकबर बुधवानी,शीतल गुप्ता , मेघश्याम भवरे, प्रवीण पुसनाके, राजकुमार भवरे, विजय भवरे सुखदेव चरूळकर, मयूर तिवारी, सुरेश सोननकर, नीतीन धोंगडे( मंगरूळ ), संदीप नेवारे, पंचम जयस्वाल ,बन्सोड सर, श्रीराम चरूळकर, गौरीनंदन कनाके, श्वेता पुरी, दिपिका इंगळे, श्रद्धा भद्रे या सर्वांनी शिबीरास तन, मन व धन अर्पण केले. पार्थ आडे‌ व प्रतीक्षा नाचपल्लीवार स्वयंसेवक प्रतिनिधी तसेच सर्व स्वयंसेवकांनी शिस्त व नियमांचे पालन करून शिबीर यशस्वी केले. डॉ.के.ओ. मांडगावकर , क्षेत्रीय समन्वयक पारवेकर महाविद्यालय , यवतमाळ यांनी शिबीरास सदिच्छा भेट दिली.
डॉ अनंतकुमार सूर्यकार, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांनी सर्व घटकांचे जाहीर आभार मानले.

Copyright ©