यवतमाळ सामाजिक

जिल्हा परीषदेत प्रशासक राज येताच 200 शिक्षकांचे प्रमोशन

जिल्हा परीषदेत प्रशासक राज येताच 200 शिक्षकांचे प्रमोशन

शिक्षक भारती संघटनेकडून स्वागत

यवतमाळ जिल्हा परीषदेत सदस्य, पदाधिका-यांचा कार्यकाळ संपताच प्रशासक राज सुरु झाले. या दरम्यान जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कुठलीही प्रसिध्दी न करता दोनशे पेक्षाही जास्त शिक्षकांना त्यांच्या हक्काचे प्रमोशन दिले. सन 2017 पासून रखडलेले प्रमोशन दिल्याने शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे अभिनंदन केले असून निर्णयाचे स्वागत केले आहे.

गेल्या पाच वर्षापासून विविध शिक्षक संघटना शिक्षकांच्या प्रमोशन साठी प्रयत्न करीत आहे. मात्र जिल्हा परीषदेत कायद्याचा आधार घेत उनीवा काढून शिक्षकांच्या प्रमोशन मध्ये आडकाठी निर्माण केली जात होती. अनेक जन तर हक्काचे प्रमोशन न मिळाल्याने सेवा निवृत्त झाले आहे. दरम्यान 21 मार्च रोजी सदस्यांचा कार्यकाळ संपला आणि जिल्हा परीषदेत प्रशासक राज सुरु झाले. या दरम्यान शिक्षकांच्या प्रमोशन चा मुद्दा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मांडण्यात आला. त्यांनीही हा विषय गंभीरतेने घेत उप मुख्यकार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात यांना कार्यवाहीचे आदेश दिले. शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी यांनी वेगाने हालचाली करीत संपुर्ण कागदपत्रे तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे सुपूर्द केली. प्रशासकीय कार्यवाही करीत अवघ्या चार ते पाच दिवसात प्राथमिकच्या 194 शिक्षकांना तसेच माध्यमिक च्या 17 शिक्षकांना मुख्याध्यापक पदी प्रमोशन देण्यात आले. याव्यतिरीक्त माध्यमिकचे चार पर्यवेक्षक, माध्यमिक चे 1 उपमुख्याध्यापक तसेच प्राथमिक च्या 14 शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षापासून रेंगाळलेला प्रमोशन चा विषय क्षणात मार्गी लागल्याने शिक्षकांनी सुध्दा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे आभार मानले आहे. विशेष म्हणजे लोणबेहळ येथील जिल्हा परीषदेच्या शाळेवर कार्यरत प्रभारी मुख्याध्यापक राजेन्द्र जोगमोडे हे 31 मार्च रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांना 29 मार्च रोजी प्रमोशन देण्यात आले. त्यामुळे नायक चित्रपटात ज्याप्रमाणे अभिनेता एक दिवसाचा मुख्यमंत्री बनतो तसेच राजेन्द्र जोगमोडे यांना दोन दिवस कायम मुख्याध्यापक पदी काम करण्याची संधी प्राप्त झाली.

शिक्षकांना अधिकार मिळाला

प्रमोशन शिक्षकांचा हक्क आहे. परंतु कायद्याचा आधार घेत त्यांना डावलण्यात येत होते. प्रशासक राज येताच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कायद्याचा आधार घेत शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून दिला. निर्माण झालेल्या त्रुटी, उनीवा दुर करुन घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे समाधान वेक्त करण्यात आले

Copyright ©