Breaking News यवतमाळ सामाजिक

रानडुक्करांच्या हल्ल्यात शेतकरी आईव मुलगा जखमी

पांढरकवडा प्रतिनिधी सागर मुडे

रानडुक्करांच्या हल्ल्यात शेतकरी आईव मुलगा जखमी

करंजी पासून तीन किलोमीटर अंतरावर वाढोणा खुर्द या गावातील शेतकरी श्रावण मनोहर मेश्राम वय 37 व त्यांची आई सखुबाई मनोहर मेश्राम वय 60 रा (वाढोना खुर्द) हे आपल्या शेतात काम करीत असताना त्यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केला या हल्ल्यात श्रावण व त्यांची आई गंभीर जखमी झाला श्रावण यांनी आपल्या कुटुंबा सोबत आपल्या शेतात वास्तव करीत आहे कुटुंबाला वाचविण्यासाठी शेतकरी पुत्रांनी आपले आई वडील व दोन मुलाचे रक्षण करण्यासाठी रानडुकरा सोबत अर्धातास झुंज करून आपल्या परिवाराचे रक्षण केले
याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी श्रावण यांच्या शेताकडे धाव घेतली श्रावण त्यांनी तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात बैलबंडी श्रावण हा स्वतः गंंभीर जखमी अवस्थेत आपल्या आईला गावामध्ये आणले व लगेच गावातील तरुणांनी जखमींना करंजी ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले या हल्ल्याची माहिती वनविभागाचे अधिकाऱ्यांना देण्यात आली

Copyright ©