यवतमाळ सामाजिक

मुबारक तंवर यांचे विविध मागण्यासाठी 5 एप्रिल पासून आमरण उपोषण

सावळी सदोबा प्रतिनिधी आसिफ खान

मुबारक तंवर यांचे विविध मागण्यासाठी 5 एप्रिल पासून आमरण उपोषण

सावळी सदोबा व परिसरातील जनतेच्या हिताच्या व सोयीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री. मुबारक तंवर यांनी 5 एप्रिल मंगळवार रोजी पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संबंधित अधिकाऱ्यांना दिनांक 28 मार्च रोजी दिलेल्या लेखी निवेदनातून दिलेला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
सावळी सदोबा व परिसरात विद्युतच्या समस्येने सर्वसामान्य नागरिक व शेतकरी मंडळी पार वैतागून गेली आहे, कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा व नियमितपणे विद्युत चालू राहावी तसेच सावळी सदोबा व परिसरातील श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या अनेक लाभार्थ्यांना गेल्या चार-पाच महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे.
श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना तातडीने अनुदान देण्यात यावे आणि झापरवाडी येथील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नवीन पांदण रस्ता मंजूर करावा तसेच उमरी ( काप ) येथील वार्ड नंबर 2 मधील पिण्याच्या पाण्याची समस्या विनाविलंब सोडवावी व खडका तांडा येथील मधुकर केरई व त्यांच्या परिवारातील सदस्यांना गाव नमुना 8 अ देण्यात यावा,
इत्यादी मागण्या 4 एप्रिल सोमवार पर्यंत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या नाही तर दिनांक 5 एप्रिल मंगळवार पासून सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर परिसरातील महिला व पुरुष मंडळीसह आपण आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी दिनांक 28 मार्च रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदनातून दिलेला आहे.

Copyright ©