यवतमाळ सामाजिक

आयटक कामगार – कर्मचारी संघटनाचा एल्गार

आयटक कामगार – कर्मचारी संघटनाचा एल्गार

यवतमाळ : केंद्र सरकार व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचे व जनविरोधी धोरणाच्या विरोधात देशभऱ्यातील आयटकसह प्रमुख केंद्रीय कामगार संघटना व विविध संघटीत / असंघटीत क्षेत्रातील कामगार संघटनांच्या वतीने येत्या २८ व २९ मार्च २०२२ रोजी देशव्यापी संप पुकारला होता केंद्रातील मोदी सरकार व राज्य सरकार कामगारांच्या हिताच्या कायद्याची पायमल्ली करीत असुन केंद्र सरकारचं खाजगी करणाची अंमलबजावणी करण्याचं सातत्य व कार्पोरेट विकासाचं मॉडल देशातील शहरी तथा, ग्रामीण मध्यमवर्गीय घरात , पोहोचल्यालं एलसीसीच्या स्क्रिनवर निरंतर सब कार्पोरेट का साथ ,*सब कार्पोरेट पर निर्भर जरूरतमंद ग्राहकों का विकास मन कि बात किमान वेतन बंदी के साथ* सुरू आहे.१९९१ च्या मागील केंद्र शासनाने स्विकारलेली धोरणाचीच रि सध्याचं केंद्र सरकार खाजगीकरण, उदारीकरणाची पाऊले देशातील कामगार किसान देशातील कर्मचारी संघटीत, असंघटीत श्रमीकांना तुडविण्यास पुरेसे होत चालले आहे. आंदोलने सुरूच आहेत. लोक त्रस्त आहेत. त्या विरोधामध्ये संघटीत होत आहेत.परंतु निरंतर आंदोलनांवर लोकांचा प्रभाव वाढण्याऐवजी लोकांमध्ये भ्रम पसरविणारी यंत्रणाही सुरू आहे. अशा दुविधेमध्ये लोकांनी निवडून दिलेले सरकार लोकांचे प्रश्न सोडविण्या ऐवजी मुठभरांची विकासाची बात करते आहे. तेव्हा शासनाने दाखविलेलं गोंडस स्वप्न जनतेला दिलेलं विश्वगुरूचं आस्वासन देशातील लोकांना दाखविलेलं स्वप्न जर खरं असेल तर लोक रस्त्यावर का येत आहेत.कर्मचारी का त्रस्त आहेत.७५० शेतकऱ्यांच्या शहादती का झाल्या ? करीता आयटक सलग्न संघटनांचं व १० केंद्रीय कामगार संघटनांच आंदोलन आपल्या मागण्या सह हल्ला बोल करतो आहे . मागण्या कृषी करीता – केंद्र सरकारने एमएसपी करिता कमीटी नेमावी. एमएसपीवर कायदा बनवावा. (किमान आधारभूत किंमत) ,विज बिल २०२०-२०२१ चे ड्राप – विधेयक वापस घेण्यात यावे.पेट्रोल डिझेल गॅसवरिल केद्रीय कर कमी करा , जिवनावश्यक वस्तुंची महागाई कमी करा. श्रमसंहीता रद्द करा , कामगारांचे बाजुचे सर्व कामगार कायदे पुन्हा प्रस्थापित करून त्याची कडक अंमलबजावणी करा , कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खाजगीकरण करू नका.राष्ट्रीय रोखीकरण पाइपलाइन रद्द करा ,आयकर लागू नसलेल्या कुटुंबांना स्वस्त धान्य आणि मासीक ७५०० रूपये रोख अनुदान द्या , मनरेगासाठी निधीची तरतूद करून सर्वांना किमान ६०० रूपये रोजावर वर्षातून २०० दिवस रोजगाराची हमी द्या.शहरी भागाला रोजगार हमी लागु करा. बेरोजगारांना जगण्या इतका बेकारी भत्ता द्या, सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन सहीत सर्व सामाजीक सुरक्षा लागु करा , आशा वर्कर व गटप्रवर्तक , अंगणवाडी सेविका – मदतनीस , शालेय पोषण आहार कर्मचारी, उमेद कॅडर कर्मचारी , रूग्ण कल्याण समीती सफाई कामगार / परिचर , अंशकालीन स्त्री-परिचर , उमेद कॅडर कर्मचारी – वर्धनी , आरोग्य सखी , आर्थिक साक्षरता सखी , उद्योग सखी , बॅंक सखी , पशु सखी , कृषी सखी , मस्त सखी , पेरीका सखी, सीएलएफ-एम प्रभाग व्यवस्थापक , ग्रामपंचायत कर्मचारी, ग्राम रोजगार सेवक, अंशकालीन स्त्री-परिचर , या सर्वांना किमान वेतन रू.२१०००/– मानधन/वेतन द्या. शासकीय सेवेत कायम करा.सामाजिक सुरक्षा लागु करा. थकीत मानधन ताबडतोब अदा करा व योजना बंद करू नका.या सह एकुण १८ मागण्या करण्यात आल्या निवेदनावर आयटकचे कॉ.विजय ठाकरे , कॉ.दिवाकर नागपुरे , कॉ.संजय भालेराव, कॉ. सविता कट्यारमल ,कॉ गया सावळकर,कॉ रंजना राउत, रंजना सोनोने , पल्लवी रामटेके, वंदना बोंडे, मालती गांवडे , सुनिता चव्हाण , आशा बडेराव , सुरेखा कुंभारे ,विजया तायडे , वैशाली मुनेश्वर , माला ठाकरे , अमोल मनवर, निरंजन गोंधळेकर, सुरेश माळवी, ईश्वर दरवरे, ज्योती रत्नपारखी, ममता भालेराव, मंजुळा जगताप इत्यादींच्या सहा आहेत.

वृद्ध साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना,
पंचायत समिती स्तरावर सादरीकरणाचे आयोजन

यवतमाळ दि. 29 मार्च : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र राज्यातील मान्यवर वृद्ध साहित्यिक व कलावंतांना दरमहा मानधन देण्याची योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सन 2019-20, 2020-21 व 2021-22 मधील कलावंताची मानधनाकरिता निवड करण्याकरिता जिल्हास्तरीय निवड समितीची सभा 22 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. सदर सभेमध्ये झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने खऱ्या व गरजू कलावंताची मानधनासाठी निवड व्हावी याकरिता तालुकास्तरीय छाननी समिती गठीत करण्यात आली असून संबंधीत पात्र अर्जदारांचे प्रत्यक्ष सादरीकरण आयोजित करणेबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे.

दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी यवतमाळ व कळंब तालुक्यातील कलाकारांचे सादरीकरण पंचायत समिती सभागृह यवतमाळ येथे होईल. 6 एप्रिल रोजी राळेगावचे राळेगाव पंचायत समिती येथे तसेच दारव्हा, दिग्रस व आर्णी येथील सादरीकरण दिग्रस पंचायत समिती येथे हाईल, 7 एप्रिल रोजी पुसद व महागाव येथील पंचायत समिती सभागृहात सादरीकरण होईल. तसेच वणी, मारेगाव व झरी जामणी येथील सादरीकरण पंचायत समिती वणी येथे होईल. 8 एप्रिल रोजी उमरखेड येथे सादरीकरण होईल. 13 एप्रिल रोजी नेर व बाभुळगाव चे सादरीकरण नेर येथे होईल. 19 एप्रिल रोजी घाटंजी व पांढरकवडा येथील सादरीकरण पांढरकवडा पंचायत समिती सभागृहात होईल.

पात्र अर्जदार कलाकारांनी दिलेल्या तारखेवर सकाळी 11 वाजता संबंधीत तालुक्यातील पंचायत समिती सभागृहात मुळ संचिकेसह सादरीकरणासाठी उपस्थित राहावे. पात्र अर्जदारांची यादी संबंधीत पंचायत समिती स्तरावर उपलब्ध असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी कळविले आहे.

_________________________________________________

शासनमान्य ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया प्रारंभ

 

यवतमाळ दि. 29 मार्च : महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परिक्षेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अभ्यासक्रम पुर्ण करणाऱ्यांना नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत.

ग्रंथपालन अभ्यासक्रमाच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी दहावीची गुणपत्रीका, टी.सी. व आधारकार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी मंगलमुर्ती सार्वजनीक वाचनालय, मंगलमुर्ती नगर येथे तसेच ९८५०२५९३९२, ८३२९०७१९१२, ८४२२९२१८७४, ९४२१८५५९३३, ८९९९४९८५४२ व ९९६०६३०८९८ या भ्रमणध्वनी क्रमांकावर २० एप्रिल २०२२ पर्यंत संपर्क साधावा, असे जिल्हा ग्रथालय अधिकारी राजेंद्र कोरे यांनी कळविले आहे.

_____________________________________________

 

 

महागाव येथील शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकाऱ्यांनी केला रद्द

 

यवतमाळ दि. 29 मार्च : महागाव येथील त्रिमूर्ती महिला बचत गटातर्फे चालविण्यात येणाऱ्या शिवभोजन केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज 29 मार्च 2022 रोजी तात्काळ प्रभावाने रद्द केला आहे.

जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील शिवभोजन केंद्रातून अस्वच्छ पद्धतीने शिवभोजन थाळी वितरीत करण्यात येत असल्याबाबत प्राप्त तक्रार व वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध बातमीचे अनुषंगाने चौकशी करण्यात येवून वरील कार्यवाही करण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी कळविले आहे.

_______________________________________

तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर

तृतीय पंथीयांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

यवतमाळ दि. 29 मार्च ३१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय तृतीय पंथी ओळख दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून यवतमाळ जिल्ह्यामध्ये जिल्हा निवडणूक कार्यालयामार्फत २७ मार्च ते २ एप्रील या कालावधीत तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयात विशेष शिबिरांचे आयोजन केले आहे. या शिबीराचा लाभ घेवून तृतीयपंथीयांनी मतदार म्हणून आपली नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

तृतीय पंथीयांकडे मतदार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांची असलेली कमतरता लक्षात घेऊन भारत

निवडणूक आयोगाने त्यांना कागदपत्रांबाबत सवलत देऊ केली आहे. १८ ते २१ वयोगटातील ज्या तृतीय पंथी व्यक्तीकडे वयाचा कोणताही पुरावा नसेल, तर त्यांच्या गुरु माँ ने दिलेले प्रमाणपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. तसेच, २१ वर्षावरील तृतीय पंथीयाने वयाचा पुरावा म्हणून स्वतःच सांगणारे प्रमाणपत्र दिल्यास अधिकृत मानले जाते. पत्त्याचा पुरावा म्हणून संबंधित व्यक्तिच्या सध्याच्या निवासस्थानी आलेले टपालसुध्दा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते. या कागदपत्रांनुसार नोव्हेंबर २०२१ मध्ये झालेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत म्हणजे मतदार नोंदणीच्या मोहिमेमध्ये राज्यभरातून मोठ्या प्रमाणात तृतीय पंथीयांची नोंदणी करुन घेण्यात आली होती.

जिल्ह्यातील सर्व पात्र तृतीय पंथीय नागरिकांची मतदार यादीत नोंदणी करणे हे जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाचे उद्दिष्ट आहे. तहसिल कार्यालयातील शिबीरासोबतच जिल्ह्यामध्ये ज्या भागात तृतीय पंथीयांच्या मोठ्या प्रमाणात वसाहती आहेत, अशा ठिकाणी मतदार नोंदणीची शिबिरे आयोजीत केली जाणार आहे. तेव्हा यंदाच्या तृतीय पंथी ओळख दिनाच्या निमित्ताने तृतीय पंथीयांसाठी कार्यरत सामाजिक संस्थांनी आणि व्यक्तिंनी या मोहिमेला सहकार्य करुन अधिकाधिक तृतीय पंथीयांनी या विशेष सप्ताहात मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण लाडखेड येथे संपन्न

लाडखेड दारव्हा पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्रीय शाळा लाडखेड येथे शाळा पूर्व तयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक गट समन्वयक पं.स.दारव्हा तथा केंद्रप्रमुख मारुती पडाळ हे होते.तर अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किशोर उईके प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रणिता मोरे, वैशाली मानकर हे होत्या.
नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांची शाळापूर्व तयारी होण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण घेण्यात आले
या उपक्रमा अंतर्गत मुले व पालक यांचे मार्च अखेर एक व जूनच्या सुरुवातीला एक असे दोन मेळावे शाळा स्तरावर घेण्यात येणार आहे. पहिल्या मेळाव्यात मुले पहिलीत दाखल होण्यापूर्वी त्यांच्यामध्ये मूलभूत क्षमता किती विकसित आहेत याची नोंद कृतीच्या मदतीने घेतली जाणार आहे.ज्या मुलांना मूलभूत क्षमता आवश्यक असलेल्या कृती करताना मदतीची गरज लागते त्या मुलांच्या पालकांना शिक्षक व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून समुपदेश करणार आहे तसेच दुसऱ्या मेळाव्या पर्यंत च्या कालावधीत पालकांच्या भेटी घेऊन समुपदेशन करण्यात येणार आहे.
यावेळी लाडखेड केंद्रातील सर्व मुख्याध्यापक कुंभारे सर, विलास राठोड, शाहिद परवेझ, किशोर हिरुळकर,ओमकार मडावी, ओमकार बोरकर तथा शिक्षक व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा कराळे आभार प्रदर्शन सुनिता नासरे यांनी केले. कार्यक्रमातील उपक्रम घेण्यासाठी सिंधुताई दुधे, शिल्पा काळे, प्राजक्ता दुधे यांनी परिश्रम घेतले.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©