यवतमाळ सामाजिक

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३८९ महिलांना नाम फाऊन्डेशनने दिला मदतीचा हात

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३८९ महिलांना नाम फाऊन्डेशनने दिला मदतीचा हात

“नाम” माणसानी माणसासाठी सुरू केलेली माणुसकीची चळवळ- नितीन पवार, जिल्हा समन्वयक यवतमाळ

नाम फाउंडेशन च्या वतीने सिने अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून उभी राहलेली नाम फाउंडेशन २०१५ पासून शेतकरी व शेतकरी कुटुंबांकरिता कार्य करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना आधार देण्याचे काम मागील सात वर्षा पासून सुरु आहे. यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील १६ हि तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३८९ महिलांना प्रती महिला २५००० रुपयाची सानुग्रह राशी देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ व बाभूळगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुंटूबातील 41 लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले याकरिता विदर्भ व खानदेश समन्वयक हरीश इथापे वर्धा यांचे मार्गदर्शन लाभले.दिनांक २९ मार्च २०२२ रोजी मंगळवार ला सायंकाळी शिव छत्रपती व्होलीबॉल क्लब जोडामोहा येथे धनादेश वितरीत करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख उद्घाटक म्हणून नाम यवतमाळ जिल्हा समन्वयक नितीन पवार यांनी प्रस्ताविकेतुन नाम फाउंडेशनचा उद्देश व कार्येप्रणालीची विस्तृत माहीती दिली. संचालन सचिन सकरकर यांनी केले. या कार्यक्रमात खालील मान्यवर उपस्थित  सुनंदा मुरकुटे सरपंच जोडमोहा जिद्देवार कृषी सहाय्यक.
सुमनताई राजूरकर पो. पाटील ज्ञानेश्वर धानफुले मा. अभिलाष नीत मा. पवन धोत्रे मा. नारायण जाधव मा.पवन जाधव मा. संदीप शेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नाम फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक नितीन पवार तसेच सचिन साकरकर, धीरज भोयर, प्रशांत भोयर, निशा आणेवार, राजू ढोरे, प्रवीण धाकूळकर, कुलदीप कळंमकर, सागर राऊत, आशिष खेकारे, यांच्या सहकार्यातून नियोजन बद्धतेतुन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Copyright ©