विवाह समारंभात वादळ वाऱ्यानी आकाशात उडविला मंडप तर तीन वर्हाडी जखमी
वऱ्हाडाणा उपाशापोटीच परतावे लागले
भाम (राजा) येथील आज जिल्हा परिषद शाळेत विवाहाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले भव्य असा मंडप गच्च पाहुण्यांनी भरला होता एक एक विधी करण्यास सुरुवात झाली आणि विवाह सुरू असताना अचानक वादळाने रौद्र रूप धारण केले आणि पहाता पहाता विवाहाचा मंडप आकाशात गवसणी घालत एकच कल्लोळ उडाला वरहाडाची पळापळ सुरू झाली कुणी कुणाच्या अंगावर लाथा देत पळत होते यात एक पाच वर्षीय चिमुकली जखमी झाली तर एक महिला व एक पुरुष जखमी झाला एक वर्हाडी महिला बेशुद्ध झाल्याने तिला रुग्णालयात तातडीने नेण्यात आले या विवाहातील मंडप काही विद्युत तारेवर अडकला तर काही गावातील घरांवर जाऊन पडला मंडपाला लावण्यात आलेले लोखंडी पाईप तुटून पडले या वेळचे हे चित्र अत्यंत भयावह होते कुणी कुणाल तुडवत स्वतः चा जीव वाचविण्याची जो तो प्रयत्न करीत होता या विवाहाला जवळपास चारशेहून अधिक वऱ्हाड असल्याचे सांगण्यात येत आहे पाहुण्यांसाठी तयार केलेले जेवण एकाच्याही पोटात पडले नाहि त्यांना उपाश्या पोटीच परतावे लागल्याने हि घटना. सर्वत्र वाऱ्या प्रमाणे पसरली मंडप साचालकानी वेळीच विद्युत पुरवठा बंद केल्याने मोठी हानी टळली हे वऱ्हाड आरंभी येथून भांब राजा येथे मोहन दगडु राठोड यांचे मुलीच्या विवाहास आले होते मात्र या अचानक आलेल्या वादळाने आनंदावर विरजण पडले जिथे तिथे या घटनेची उत्सुकेपोटी चौका चौकात चर्चा सुरू झाली आणि अनेक वर्हाडी निघून गेले.
Add Comment