बेला प्रतिनिधी कैलास साठवणे
बेला येथील दोन प्रेमी युगुलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
महेश शालिक ठाकरे वय 28 वर्ष राहणार बेला व कुमारी तनवी विठ्ठल चुटे वय 15 वर्ष राहणार वडगाव बेला या प्रेमीयुगुलाने दिनांक 25 ,3 ,2022 ला दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घरून पळ काढला , व घराबाहेर जाऊन दोन दिवस बाहेर काढत आज दिनांक 28 मार्च 2022 ला समुद्रपूर तालुक्यातील उमरी गावाजवळ एका शेतातील विहिरीत दोघांनी हातात हात घालून उडी मारली व जीवन यात्रा संपविली,
विमलाबाई तिडके गर्ल हायस्कूल बेला तिचे नव्या वर्गात शिकणारी तन्वी 28 वर्षीय महेश शालिक ठाकरे याच्या प्रेमात पडली दोघांनी जीवनाची सुरुवात करायची म्हणून आणाभाका घेतल्या व शनिवारी दोघेही घराबाहेर पडले, सायंकाळी आई वडील घरी आले तेव्हा बघितले तर मुलगी घरी नव्हती आजूबाजूला विचारणा झाली परंतु कुणीच काही सांगितले नाही शेवटी आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली, बेला पोलिसांनी तक्रार नोंदवत प्रकरण तपासामध्ये ठेवले अशातच आज दुपारी एक वाजता च्या दरम्यान मुलीच्या नातेवाइकांना माहिती मिळाली की हे दोघेही प्रेमीयुगल उमरी येथील एका शेतात आंब्याच्या झाडाखाली बसलेले आहेत , तेव्हा मुलाचे भाऊजी मोटरसायकल ने घटनास्थळी गेले असता त्यांच्या डोळ्यादेखत दोघांनी जवळ असलेल्या विहिरीत हातात हात घालून उडी मारली शेतात कोणी नसल्याने आरडाओरड केली परंतु कोणीही मदतीला धावून आले नाही, त्या विहिरीत गाळ असल्यामुळे हे दोन्ही प्रेमीयुगल गाळात रुतून बसले त्यामुळे ते वर काही येऊ शकले नाही, घटनेची माहिती बेला पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व समुद्रपुर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या उमरी गावाच्या बिट जमदारकडे प्रकरण सोपविले अथक प्रयत्नानंतर त्या दोघांना विहिरीतून बाहेर काढण्यात आले व उत्तरीय तपासणीकरिता वर्धा येथील शासकीय रुग्णालयात दोघांचे मृतदेह पाठविण्यात आले, पुढील तपास समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री काळे हे करीत आहेत,
Add Comment