सहकार्यकरी संपादक गोकुल खडसे
मुजोर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांनी खोदला नुकताच बनवलेला रस्ता.
यवतमाळ शहरातील उमरसरा भाग हा तसा अनेक वर्षे विकासापासून दूर राहिलेला परिसर. नुकतंच प्रभाग क्रमांक : २२, निखिल नगर येथे प्रशासना मार्फत नवीन रस्त्याचे बांधकाम करण्यात आले परंतु खाली डोके.. वरती पाय या म्हणी प्रमाणे जीवन प्राधिकरणाने येथील नागरिकांची कुठलीही संमती न घेता, त्यांना विश्वासात न घेता कनेक्शन च्या नावाखाली नवीन रास्ता खोदून काढला. नागरिकांचा रोष वाढल्यानंतर कर्मचाऱ्याने तेथून आपला काढता पाया घेतला. वास्तविकतेत कुठलेही खोदकाम करायचे असल्यास तेथील रहिवाश्यांची परवानगी किंवा अधिकृत लिखित ऑर्डर असणे आवश्यक असते परंतु मुजोर जीवन प्राधिकरण आणि कर्मचाऱ्याने आपल्या बुद्धीला त्रास देण्याचे कष्ट घेतले नाही. संबंधित काम जर पुढे नेण्यात आले तर आंदोलनाचा इशारा येथील नागरिकांनी दिलाय.
Add Comment