ग्रामपंचायत सदस्यांची विष पाजून संपवली जीवन यात्रा
हत्या, प्रकरणी पाच जणांना केली अटक
जंगल वडगाव पोलिसांची कारवाई
लोणी घटाना येथील
ग्रामंचायत सदस्य अंकुश विजय चव्हाण वय २५ यास प्रथम बेदम मारहाण करण्यात आली नंतर त्याला विष पाजण्यात आले असल्याचे स्वत: केलेल्या रिकॉर्डिंग वरुन स्पष्ट झाले या सर्व घटनेची रिकॉर्डिंग मृतकानी आपल्या भावास सेंड केली यावरून त्यांनी वडगाव जंगल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याने वडगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार पवन राठोड यांनी ३०७,३४ गुन्हे दाखल केले असता अंकुश यांच्या दिनांक 25 मार्च 2022 ला उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्हा कलम 302 समाविष्ट करून आरोपी संजय दासु चव्हाण वय 50, चेतन संजय चव्हाण वय 25 ,चिरंजिव संजय चव्हाण वय 20,रेशन मनोज चव्हान वय 22, करण मनोज चव्हाण वय 20, या पाचही आरोपीना तात्काळ अटक करण्यात आली अंकुश हा रुग्णालयात उपचार घेत असताना २५ मार्च ला सायंकाळी ४ वाजता डॉ.नी मृत घोषित केले
ही कार्यवाही डॉ भुजबळ पाटील अधीक्षक, डॉ धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगल पोलीस ठाणेदार पवन राठोड,भास्कर दरणे ,शेकदार,गणेश आगे निलंकामल भोसले, अक्षय डोंगरे,चव्हाण यांनी पार पडली पुढील तपास स. पो. नि.पवन राठोड वडगाव जंगल ठाणेदार करीत आहे,या घटनेची परिसरात भीतीचे वातावण निर्माण झाले आहे जिल्ह्यात सतत खुनाचे सत्र सुरू असल्याने कुणालाही कुणाचे भय सल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Add Comment