यवतमाळ सामाजिक

रक्तदानातून जपला निरागसतेचा भावार्थ यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप ने दिली मदत

रक्तदानातून जपला निरागसतेचा भावार्थ
यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप ने दिली मदत

विश्वव्यापक मानवता टिकवून ठेवण्यासाठी केलेली निरागस हालचाल म्हणजे रक्तदान. रक्तदानातून इतरांच्या भावनांचा विचार करून माणुसकी जपली जाते, आणि प्राणहानी टळते. असा भावार्थ दाखवणारी घटना, त्यामधून स्वार्थासाठी जगणाऱ्या समस्त तरुणांना मानवतेचा संदेश मिळतो.
गरजूंना रक्ताची मदत करण्यास कधीच मागे न हटणाऱ्या रक्तविर बहुउद्देशीय संस्थेचे प्रफुल भोयर यांच्या माध्यमातून श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात भर्ती असलेल्या श्री. लक्ष्मण कामतवार या रुग्णाला रक्तदाते उज्वल ओंकार यांनी ओ-पोझीटीव्ह गटाचे रक्त विनामुल्य दिले.
सदर रुग्णाला रक्त मिळावं म्हणून अनेकांनी केलेल्या असफल प्रयत्नानंतर यवतमाळ जिल्हा रक्तपेढी ग्रुप वर मिळालेल्या माहितीवरून प्रफुल यांनी रक्तदाते शोधण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे रक्तदाते उज्वल ओंकार यांनी स्वैच्छिक रक्तदान केल्याने दातृत्वाचं मोल सर्वाना कळले. अनेक प्रतिष्ठीतांनी फोन वरून शुभेच्छा देत सेवेच्या कामाची पावती दिली. यासाठी गृपच्या सर्व सदस्यांनी रक्तदाते व प्रफुल यांचे कौतुक केले.

Copyright ©