Breaking News यवतमाळ

रत्नापूर येथील अरुणावती व आडान नदीच्या संगमावर इसमाचा मृतदेह आढळला

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

रत्नापूर येथील अरुणावती व आडान नदीच्या संगमावर इसमाचा मृतदेह आढळला

सावळी सदोबा:.पारवा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रत्नापूर येथील अरुणावती व अडाण नदीच्या संगमावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून,मृतकाच्या खिशात सापडलेल्या डायरीमध्ये आधार कार्ड सापडले असून,गावातील आजूबाजूच्या नातेवाईकांना कडून मृतक व्यक्तीची ओळख पटली असून मृतकाचे नाव सुभाष किसन मडकाम वय ४८ वर्षे राहणार माणूसधरी ता.घाटंजी येथील असल्याची खात्री पटली असुन,
सविस्तर वृत्त असे की काल मंगळवार रोजी अरुणावती व अडाण नदी काठावर असलेल्या संगमावर सटवाई देविचा कार्यक्रम असल्याने सुभाष तिथे गेला असल्याचे अंदाज वर्तविले जात आहे,पोहताना न आल्याने त्यांचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत,पारवा पोलिस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले असून,घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, पुढील तपास सावळी सदोबा येथील बीड जमादार गजानन शेजुळकर करीत आहे

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Copyright ©