यवतमाळ सामाजिक

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत डाटा दुरूस्तीसाठी 25 मार्च रोजी ग्रामस्तरावर शिबीराचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत डाटा दुरूस्तीसाठी 25 मार्च रोजी ग्रामस्तरावर शिबीराचे आयोजन

यवतमाळ दि. 23 मार्च, : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत स्वयंनोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची भौतीक तपासणी, गावनिहाय सामाजिक अंकेक्षण, पोर्टलवरील डाटा दुरुस्ती, योजने संदर्भातील तक्रारी इत्यादी प्रलंबीत कामकाजाचा निपटारा करून पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यासाठी 25 मार्च रोजी गावपातळीवर शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांचे डाटा दुरुस्तीचे काम महसूल, कृषी व ग्राम विकास विभागांच्या समन्वयाने जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्यात येत असून कृषीमीत्र, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे शिबरात उपस्थितीत राहतील.

अर्जदार शेतकऱ्यांनी शिबीराचा लाभ घेण्यासाठी शेतीचा ७/१२ उतारा, आधारकार्ड, बॅकेचे पासबुक इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. योजनेच्या अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्रातील कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एन.एम. कोळपकर यांनी कळविले आहे.

Copyright ©