यवतमाळ सामाजिक

एकाच दिवशी एकाच ठिकाणी पकडलेल्या 3 अजगराला दिले जिवदान

एकाच दिवशी एकाच ठिकाणी पकडलेल्या 3 अजगराला दिले जिवदान

आसेगाव देवी शेतशिवारातील घटना

बाभूळगाव तालुक्यातील आसेगाव देवी येथील उडाखे यांच्या शेत शिवारात खूप मोठा साप असल्याची माहिती यवतमाळ येथील वनविभागाला तेथील जागरूक नागरिकांनी दिली. यवतमाळ येथील वनपरिक्षेत्र अधिकारी . अमर शिडाम यांनी टीम चे संस्थापक व अध्यक्ष वन्यजीव रक्षक निलेश भाऊ मेश्राम
यांना देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षत घेता एम एच २९ टीम ने घटनास्थळी पोहचून शेतालगत असल्याल्या पांदण रस्ताच्या बाजूला असलेल्या गोठयातील मोठ्या बिळात तीन अजगर जातींचे भले मोठे साप आढळून आले.
एम एच २९ मदत टीम ने
व्यवस्थित सापांना पकडून तेथील जमलेल्या नागरिकांना सापाबद्दल माहिती दिली. माहिती देताना नीलेश मेश्राम यांनी सांगितले की पकडलेले अजगर लांबी पहिला अंदाजे 11 फूट,दुसरा अंदाजे 12 फूट, व तिसरा 7 फूट लांबीचा असून पूर्णपणे बिनविषारी आहे.
हा जगात वावरणारा सर्वांत मोठा बिनविषारी सर्प आहे.घनदाट वनात, झाडावर तसेच खडकाळ जमिनींवरही यांचा वावर असतो. अशी माहिती देऊन वनविभागात रितसर नोंद करून ,वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम सर,राऊंड ऑफिसर अशोक बडे यांच्या मार्गदर्शनात तीनही अजगराला त्यांच्या नसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.या सर्व रेस्क्यू मध्ये टीमचे
नीलेश मेश्राम, मोंटू तेलगोटे,वैभव खोडे,प्रशांत लुनावत, जीवन तडसें, बॉबी बागमरे,दुशांत शलके, ओम ठाकरे,तुशार ब्राम्हणकर,तेजस शुल्कला तसेच आसेगाव देवी येथील सरपंच सचिन चव्हाण ,सुभाष भबुतकर,,सचिन भुजबळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Copyright ©