यवतमाळ सामाजिक

चिचबर्डी या गावात जागतिक जल दिवस साजरा

चिचबर्डी या गावात जागतिक जल दिवस साजरा

यवतमाळ तालुक्यातील चिचबर्डी या गावात रिलायन्स फाउंडेशन आणि NIWCYD संस्था व Water Aid India यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिवसाचे औचित्य साधुन, गावात पाणी गुणवत्ता तपासणी करण्यात आली. तसेच जलशपथ घेण्यात आली.
या कार्यक्रमात, जल दिवसानिमित्त, पाण्याचा योग्य वापर या विषयावर प्रतिज्ञा घेण्यात आली, गावातील सार्वजनिक विहिरीच्या पाण्याची तपासणी करण्यात आली, गावकऱ्यांना पाण्याचे महत्त्व सांगून, पाण्याची बचत कोण्या पद्धतीने करायची या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात गावातील सरपंच मा. नंदकिशोर कुमरे, पाणी व महिला संस्थेचे मा. सुनिल नाईक सर, मा. शुभम भावेकर सर, रिलायन्स फाउंडेशन चे गौरव राऊत व गावातील महिला आणि पुरुष उपस्थित होते.

Copyright ©