यवतमाळ सामाजिक

संकल्प फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

संकल्प फाउंडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

संकल्प फाउंडेशन ह्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्थेचा वर्धापन दिन स्थानिक सहकार भवन,आर्णी रोड येथे संपन्न झाला,दिमाखदार सोहळ्याचे उदघाटन श्री शंकर बाबा पापळकर ह्यांच्या शुभहस्ते पार पडले,ह्या नेत्रदीपक सोहळ्यात निवासी उपजिल्हाधिकारी श्री ललीतकुमार वऱ्हाडे ह्यांचा सहृदय सत्कार ह्यावेळी करण्यात आला,आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दोन वर्षांपूर्वी संकल्प सोबत वॉटर कप स्पर्धेत प्रत्यक्ष सहभाग उपजिल्हाधिकारी ह्यांचा होता म्हणून एक प्रतिमा त्यांना भेट देण्यात आली, व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व श्री सुरेश राठी तर जिल्हा परिषद कर्मचारी पत संस्थेचे अध्यक्ष श्री राजुदास जाधव, महाराष्ट्रातील एकमेव महिला सर्पमित्र व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्रीमती वनिता बोराडे,मेहकर ह्या उपस्थित होत्या सोबतच संकल्प फाउंडेशन ने आतापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची चित्रफीत उपस्थितांना मोठ्या स्क्रीन वर दाखविण्यात आली, ह्यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार संकल्प फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला,त्यात प्रामुख्याने पर्यावरण क्षेत्रासाठी (प्रयासवन)प्रयास च्या वतीने डॉ विजय कावलकर,मनोरुग्ण सेवेसाठी संदीप शिंदे,रक्तदानासाठी निस्वार्थ फाउंडेशन चे संकेत लांबट,भोजन सेवे साठी संतोष गायकवाड तर दिल्ली येथे महाराष्ट्राचा चित्ररथ तयार करणारे भूषण अनिल मानेकर व ग्रुप चा सन्मान चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला,कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या चेतन सेवांकुर ह्या दिव्यान्ग मुलांच्या ऑर्केस्ट्रा चे आयोजन कार्यक्रमानंतर करण्यात आले,अतिशय मंत्रमुग्ध करणाऱ्या मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम चेतन सेवांकुर च्या दिव्यान्ग मुलांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली,भारावून गेलेल्या प्रेक्षकांनी ह्यावेळी त्यांच्या कलेची कदर करीत आर्थिक स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत केली,बागडी व अग्रवाल ह्या कुटुंबीयांनी 21000 रु सुरेश राठी ह्यांनी 21000 रु डॉ माने 5000 रु व उपस्थित श्रोत्यांनी सुद्धा ह्या दिव्यान्ग मुलांना भरभरून मदत केली. पहिल्या सत्रातील कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्प चे अध्यक्ष प्रलय टिप्रमवार ह्यांनी तर आभार प्रदर्शन सौ अंजली फेंडर ह्यांनी केले,तर दुसऱ्या सत्राचे सूत्र संचालन सौ वर्षा सरागे ह्यांनी केले,पहिल्या सत्रात कर्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन करणाऱ्या विजय देशपांडे ह्यांचा तर उपस्थित श्रोत्यांमध्ये उपविभागीय अधिकारी,अनिरुद्ध बक्षी, बाळासाहेब मांगुळकर ,राजू पडगीलवार, प्रवीण देशमुख,अरुण राऊत,सुरेश चिंचोळकर ह्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला हजेरी लावली,सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बनगीनवार, अनंत कौलगिकर, ह्यांचा सुद्धा ह्यावेळी सत्कार करण्यात आला,खचाखच भरलेल्या सभागृहात संकल्प फाउंडेशन चा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता संकल्प फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याच्या दृष्टीने शहर कार्यकारिणी,महिला कार्यकारिणी,आरोग्य सेवा समिती,भोजन सेवा समिती,कृषी सेवा समिती चा विस्तार करून प्रलय टिप्रमवार व वसंत शेळके ह्यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले,दिव्यान्ग असलेल्या अभि ने टाळीतून राष्ट्रगीताची धून वाजवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली,ह्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहभोजनचे सुद्धा आयोजन ह्यावेळी करण्यात आले होते,हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे येशस्वी आयोजना साठी संकल्प फाउंडेशन च्या व संकल्प वनिता वाहिनीचया प्रत्येक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

Copyright ©