यवतमाळ शैक्षणिक

मांडवा येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

मांडवा येथे राष्ट्रीय सेवा योजना निवासी शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न

(किनवट)बळीराम पाटील महाविद्यालय किनवट राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने 20 मार्च ते 26 मार्च दरम्यान निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आज दिनांक 21 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष निवासी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम मौजे मांडवा (कि ) या गावी संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, उद्घाटक गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य संध्याताई राठोड, माजी उपसरपंच श्रीमती पुष्पाताई इरपनवार, प्रशासक तथा विस्तार अधिकारी अमृत तिरमनवार, नरसिंगराव इरपनवार माजी सरपंच माधव मेश्राम सौ सागरताई शिंदे, आरोग्य विभागाचे डॉक्टर मेश्राम मॅडम, दासरवार मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराज बेंबरेकर ,संस्था समन्वयक प्रा. राजकुमार नेमानीवार आदींच्या उपस्थितीत निवासी शिबिराचे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल राठोड उद्घाटक गटशिक्षणाधिकारी अनिल महामुने त्यांनी म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना मुळे राष्ट्रप्रेम निर्माण होऊन आदर्श नागरिक निर्माण होण्यास मदत होते ग्रामीण भागातील अडीअडचणी व त्यांच्या समस्येची जाणीव होउन सामाजिक बांधिलकी निर्माण होण्यास मदत होते असे उद्गगार त्यांनी याप्रसंगी काढले. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम महात्मा गांधी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.त्यानंतर उपस्थितांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने पुष्पगुच्छ व पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा शेषराव माने, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.सुलोचना जाधव, प्रा. लता पेंडलवार यांनी केले हा शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉक्टर स्वाती कुरमे डॉक्टर रचना हिप्पळगावकर ,श्रीनिवास रेड्डी,डॉ. पंजाब शेरे प्रा.दयानंद वाघमारे,काशिनाथ पिंपरे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थिनी शेख सालेहा ,साक्षी मीसलवार, ऐश्वर्या शेलूकर, अंकिता कनाके ,हिना जफर खान ,वैष्णवी गित्ते,निखिल खराटे, करण वर्मा, शेख रफीक,गणेश धोत्रे, आकाश मांजरमकर ,पवन बुरकुले, बजरंग जयपुरकर आदि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बळीराम पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिवराज बेंबरेकर, यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. शेषराव माने यांनी केले या उद्घाटन कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी मानले या उद्घाटन कार्यक्रमाला ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Copyright ©