यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथे शिवजयंती साजरी

सदोबा सावळी आसिफ खान

सावळी सदोबा येथे शिवजयंती साजरी

सावळी सदोबा -आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,यावेळी खालील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेलचित्राला पुष्पमाला अर्पण करून,पूजन करण्यात आलेत यावेळी अध्यक्षीय भाषणात बाळासाहेब शिंदे यांनी रयतेचे राजे भोसले की कोणतेच नाव पुढे येत नाही, एकच नाव पुढे येते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे,राजा कसा असावा तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सारखा असावा,छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास प्रत्येकाने वाचुन आपले जीवन व्यतीत करावे,छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समाजाच्या प्रत्येक घटकाने आपल्या अंगी कारायला पाहिजेत, या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संरपच अंजना ताई गेडाम श्री,प्रकाश भाऊ राठोड ,मुबारक तंवर, डॉ. रामचरण चव्हाण, नुनेश्वर आडे,प्रवीण शिंदे,अहेमद तंवर,रवी राठोड,राजु राऊत, अभिजित शिंदे, दिलीप मोरपाके, दिलीप राठोड.सावळी सदोबा पत्रकार संघटनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे कार्यकर्ता व सह परिसरातील नागरिक उपस्थित होते

Copyright ©