यवतमाळ सामाजिक

नाकापार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

नाकापार्डी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर

यवतमाळ :- विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाचे ‘ विशेष श्रमसंस्कार निवासी शिबीर ‘ चोवीस मार्च ते एकतीस मार्च या कालावधीत दत्तक ग्राम नाकापार्डी ता.जि. यवतमाळ येथे संपन्न होत आहे.
अमोलकचंद महाविद्यालयाचे निवासी शिबीर म्हणजे एक आदर्श मॉडेल असे गौरवोद्गार मागील दोन वर्षांअगोदर डॉ.राजेश बुरंगे, संचालक, संगाबाअवि यांनी काढले होते.
पंचवीस मार्चला दुपारी तीन वाजता यवतमाळ जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी, अमोल येडगे साहेब यांचे शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन संपन्न होणार आहेत. प्राचार्य डॉ. पवन मांडवकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सात दिवसीय या शिबीरात विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण- हरिश्चंद्र राठोड, घरोघरी संविधान- अॅड अमित बदनोरे, अॅड. महिंद्र ठाकरे, कृषी विषयक- कोळपकर साहेब, अविनाश सूर्यवंशी, बेदरकार, स्त्री आरोग्य व उपचार- डॉ. मौसमी वराडे,तसेच महिला मेळावा , वाहतूक नियम- नागेश जायले, समाजाभिमुख रासेयो- डॉ. अजय लाड तर समारोपीय कार्यक्रमात कुणाल झाल्टे,तहसीलदार यवतमाळ, किशोर जुनघरे, ठाणेदार, ग्रामीण यवतमाळ, पवन राठोड, सहा. पो. निरीक्षक , वडगाव जंगल यांची उपस्थिती राहणार आहे.
वनराई बंधारा, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, व्यसनमुक्ती जनजागृती, योगा व ध्यान, सामुदायिक प्रार्थना इ. उपक्रम राबविण्यात येतील. योगाचार्य गोपाल वर्मा व ज्योतीताई वर्मा, लोकशाहीर श्यामभाऊ वानखडे यांचेही मोठे योगदान शिबीरामध्ये लाभणार आहे. गावकऱ्यांच्या व महाविद्यालयाच्या संयुक्त सहकार्यातून हे शिबीर यशस्वी होईल असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा यांनी कळविले आहे.

Copyright ©