यवतमाळ सामाजिक

गजानन जुमळे अधीक्षक यांचा सत्कार

गजानन जुमळे अधीक्षक यांचा सत्कार

मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे हस्ते गजानन जुमळे अधीक्षक शासकीय निरीक्षण गृह बालगृह यवतमाळ यांना बचत भवन यवतमाळ येथे गौरविण्यात आले. मागील काळात कोरोनामुळे अनेक कुटुंबाची बिकट परीस्थिती निर्माण झाली. परंतु शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शासनाने आपल्या कार्याची दखल घेवून राज्यातून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्ह्याचा “जागतिक महिला दिन २०२२” चे औचित्यसाधून राज्यस्तरावर सन्मानपत्र देवून मा. मुख्यमंत्री यांचे हस्ते जिल्ह्याचा गौरव करण्यात आला.
जिल्हास्तरावर योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी करतांना गजानन जुमळे, परिवीक्षा अधिकारी (तत्कालीन), अधीक्षक शासकीय निरीक्षण गृह बालगृह यवतमाळ यांचे योगदान महत्वाचे आहे. जिल्ह्यात कोविड मुळे प्रभावित झालेल्या कुटुंबातील बालक व महिलांना, अर्थसहाय्य, शैक्षणिक फी माफी, बाल संगोपन योजना, विविध सामाजिक सहाय्य योजनांचा, अनाथ प्रमाणपत्र, शिधापत्रिका, शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू लाभार्थीना दरमहा किराणा वाटप, समुपदेशन सेवा, पी. एम. केअर मध्ये १२ अनाथ बालकांची नोंदणी, महिला व बाल विकासच्या सर्व निवासी संस्थामधील पात्र कर्मचारी/बालके यांचे लसीकरण, कोणत्याही बालगृहात कोविड १९ मुळे बालकांना बाधा होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना करून सतत पाठपुरावा केला व शासनास विभागातून प्रथम वेळोवेळी माहिती सादर करणे, अशा सेवा त्यांनी शासकीय पदाची जबाबदारी पार पडतांना कर्तव्ये, जबाबदारीच्या पुढे जावून संवेदनशीलपणे पार पाडल्या.
या सोबतच जिल्ह्यातील कोविड व्यतिरिक्त अनाथ निराधार बालकांचे सर्वेक्षण, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, राज्यातून जिल्ह्यात सर्वाधिक बाल विवाह रोखणे, रस्तावरील बालकांचे सर्वेक्षण करून समिती पुढे सादर करणे, अवैध दत्तक प्रकरणात विशेष कार्यवाही, विविध स्वयसेवी संस्थाचे सहभाग, महिला व बालकांच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, महिला व बालकांची संबंधित विभागामध्ये योग्य समन्वय साधून बालकांशी संबंधित सर्व अधिनियमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी, व्यापक स्वरुपात प्रचार व प्रसिद्धी इ. कार्याबद्दल आपणास उल्लेखनीय कार्यासाठी प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी श्रीम. ज्योती कडू, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, उपजिल्हाधिकारी, श्रीम. सविता चौधर, डॉ. श्रीम. स्नेहल कानीचे, अधीक्षक जिल्हा कारागृह, श्रीम. कीर्ती चिंतामणी, लोहारा ठाणेदार श्रीम. दीपमाला भेंडे, बाल कल्याण समिती सदस्या, अॅड. श्रीम. प्राची निलावार, अॅड. श्रीम. संजना गाभणे, वन स्टॉप सखी सेंटर व महिला ब बाल विकास कार्यालयाचे सर्व अधिकारी /कर्मचारी उपस्थित होते.

Copyright ©