Breaking News यवतमाळ राजकीय सामाजिक

*८०० रुपयाची मशीन २० हजाराला,शेकडो महिलांची फसवणूक*

 

शर्ट बटन बनवणारी मसीन आठशे रुपयांची विस‌ हजार मधे देवुन महिलांना फसविले जात असल्याची बाब मीनाक्षी सावळकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने दखल घेत या प्रकरणी तक्रार दखल केली असून महिलांची फसवणुक करणाऱ्या ला ताबडतोब अटक करन्याची मागणी, प्रा मिनाक्षि सावळकर राज्य समन्वयक काँग्रेस कमिटी असंघटीत कामगार महिला बचत गट तथा प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी विचार मंच. यवतमाळ जिल्हा यांनी केली आहे

आठ ते नव महिने पासुन पुणेची राधाकृष्ण सेल्स कार्पोरेशन महिला स्वयम रोजगार व प्रशिक्षण केंद्र , या नावाने यवतमाळ जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात कार्यरत असून अनेक गावातील महिला बचत गटा समवेत शेकडो महिलांना शर्ट बटण बनविणे त्या करीता मशीन घेण्यास भाग पाडणे अशा प्रकारे फसविण्याचा गोरख धंदा सुरू केला आहे,जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात खेडी यांच्या जाळ्यात अडकली आहे. आज पर्यंत महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये महिला बचत गटांना टार्गेट करून आठशे रुपयाची मशीन वीस हजार रुपयांमध्ये विकल्या जाते महिलांनी विचारलं असता वीस हजार रुपये कसे घेतात तर महिलांना म्हणतात .की आम्ही तुम्हाला बारा वर्ष काम देऊ ,ड्रेसला लावणाऱ्या शो च्या बटना या मशिन ची मार्केटमध्ये आठशे रुपये फक्त किंमत आहे. पण अजित कुमार हिवरे राहणार पुणे , हा व्यक्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांना काम देतो म्हणून महिलांच्या काही महिला प्रमुखांना टार्गेट करून त्यांच्याकडे काम सोपवतात एका महिलेला 3 मशीन विकल्या तर पंधरा हजार रुपये देतात याची एक प्रकारे साखळी सिस्टम सुरू करून हा गोरख धंदा जोमात ,यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेली आठ महिन्यापासून चालू आहे ,तीन महिने बटन विकत घेतात ,दोन रुपये प्रमाणे एक बटन. पण मार्केटमध्ये बटन ची किंमत फक्त चाळीस पैसे आहे, मग हे दोन रुपये कशे देतात यावर बऱ्याच महिलांना शंका आली,मग तीन महिने झाल्यानंतर आर्णी तालुक्यातील आणि यवतमाळ तालुक्यातील महिलांच्या बटना घेणे कमी केले ,त्यामुळे महिलांच्या लक्षात आले की आमची फसवणूक झाली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळा या गावात किशोर किसन कुंडे यांच्या घरी कार्यालय घेऊन, सुजाता सावत राहणार भांब तालुका जिल्हा यवतमाळ, या महीलेने महिलांना तुम्हाला आम्ही काम देतो तुम्हाला विदेशातील सहल करून आनतो आणि कंपनी मधे शेर देतो येवढे प्रलोभन दाखवून बचत गटातील एका एका महिलेशी जवळ पैसे नसताना सोने गाहाण ठेवन्यास भाग पाडून त्यांना मशीन घेण्यास भाग पाडत आहे ,आता तीन महिने झाले बनविलेला बटना घेण्यास टाळा टाळ चालु झाली, हर्षदा मून राहणार यवतमाळ यांनी महिलांना उडवाउडवीचे उत्तर दिल्यामुळे महिलांनी आपली फसवणूक झाल्यामुळे पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर करून, आमच्याकडून वरील व्यक्तीने आठशे रुपयाची मशीन वीस हजार रुपयात दिल्यामुळे व पुढील कामही देत नसल्यामुळे आम्ही यांच्याकडे पैसे मागायला गेलो असतात आम्हाला शिवीगाळ केली व तुमच्याकडून जे होते ते करून घ्या अशा प्रकारे महिलांना अपमानित करीत आहे, ,या प्रकरणी आज , जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निवेदन सादर करीत महिलांची फसवणूक करणाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी प्रा.मीनाक्षी सावळकर यांनी केली
सध्या मोठ्या प्रमाणात पुसद तालुक्यामध्ये मशीनचा महिलांच्या माध्यमातून विकण्याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार चालू आहे. तरी अधिक महिलांची फसवणूक न होऊ देता .पोलीस यंत्रणा ताबडतोब, सुजाता सावंत, हर्षदा मून, आणि अजित कुमार हिवरे पुणे यांना त्वरित अटक केल्यास पुढे होणारी फसवणूक थाबवता येईल अशी मागणी सौ वर्षा अजय म्हैसकर अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच, प्रभा निरडवार ,प्रतीभाअमझरे अश्विनी अंमझरे मंगला बोलावार, वर्षा चिंतावार सुभाष गोणेवार ,दत्त एकंडवार ,मंगला एकवार, ,उषाताई खोडकर, मिना भास्कर, वर्षा कालेकर, अमला वानखेडे ,रंजना किरपान ,दिपाली गुल्हाने नलीनी कुंडे, त्रिवेणी गाडीवाले, ,वर्षापालक, प्रिती इरतकर संजिवणी‌ चव्हाण, अश्विनी रिठे नागापुरे ,शुभागि पवार ,उषाताई इरतकर, ज्योती तोडकर ,संजय आमझेरा इत्यादी महिला उपस्थित होत्या

Copyright ©