यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा येथील पत्रकार संघटनेकडून आयता येथील जयस्वाल कुटूंबियांना आर्थिक मदत

सदोबा सावळी प्रतिनिधी आसिफ खान

सावळी सदोबा येथील पत्रकार संघटनेकडून आयता येथील जयस्वाल कुटूंबियांना आर्थिक मदत

सावळी सदोबा:- 9 मार्च रोजी मौजा आयता येथील विनोद जयस्वाल यांच्या घरामध्ये पत्नी काजल स्वयंपाक करताना गॅस लीक झाल्याने घरगुती गॅसच्या स्पोट झाला,या स्पोमुळे मोठ्या प्रमाणात जयस्वाल यांच्या घराला आग लागली,आगीने एवढे उग्र रूपधारण केले होते की,घरामध्ये स्वयंपाक करत असलेल्या काजलचा व घरात खेळत असलेल्या परीचा घरामध्येच गुदमरून मृत्यू झाला,या घटनेमुळे संपूर्ण सावळी सदोबा परिसरातील समाजमन सुन्न झालेल आहे,परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,जयस्वाल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी,आपल्या परिसरात एवढी मोठी घटना घडली असताना आपण वाढदिवसाचा आनंद उत्सवकरणे साफ चुकीचे आहे,जयस्वाल कुटुंबीयांचेदुःख म्हणजे आपलेच दुःख समजून,आज दैनिक लोकमत पत्रकार राम पवार यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेऊन, दुःखाचा डोंगर कोसळला आयता येथील जयस्वाल कुटुंबियांना संत्वनपर भेट देऊन,सावळी सदोबा पत्रकार संघटनेकडून तथा दैनिक लोकमत पत्रकार राम पवार यांच्याकडून आयता येथील जयस्वाल कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात आली,यावेळी ग्रामीण पत्रकार संघटना सावळी सदोबा व प्रेस क्लब सावळी सदोबा यांचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते

Copyright ©