सामाजिक

*उत्तमरावजी राठोड यांच्या स्मृर्ती दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन*

 

किनवट प्रतिनिधी

बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्याचे माजी महसुल मंत्री,खासदार, किनवट शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. उत्तमरावजी राठोड यांच्या स्मृर्ती दिनानिमित्त दिनांक 7 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे एका रक्तदानामुळे प्राण वाचू शकतो. रक्तदान हेच जीवनदान आहे.रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा रक्त न मिळाल्याने मुत्य झाल्याच्या घटना वाचतो. समाजातील रक्तदानाविषयी गैरसमज दूर करून त्यांच्या मध्ये जागृती निर्माण करून रक्तदात्यांची संख्या वाढविने नितांत आवश्यक आहे.

रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरीमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशन्टचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते. आपण रक्ताची निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे रक्तदान करणे हा रक्त मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे.

रक्तदान केल्याने केवळ इतरांचे आयुष्यच वाचत नाही तर रक्तदात्यासाठीही रक्तदान फायदेशीर ठरते. आपण अनेकदा विचार करतो की आपल्या शरीरातील रक्त दुसऱ्यांना देणे सुरक्षित आहे का याचे काही साईड एफ्फेक्ट्स तर नाहीत ना? पण नाही, रक्तदान केल्यावर, शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो.त्यामुळे

डाँ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय जिल्हा रूग्णालय, नांदेड येथील रक्तसंक्रमण आधिकारी रक्तसंंकल करून गरजुवंत रुग्णांना पुरवठा करीत असतात. रक्तदात्यांना प्रमाणापत्र देऊन सन्मान करण्यात येईल. या शिबिरास विद्यार्थी व युवकांनी उस्फूर्त असा प्रतिसाद द्यावा. असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे, पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेम्मानीवार, रासेया कार्यक्रम आधिकारी प्रा.शेषराव माने,प्रा.पुरूषोत्तम यरडलावार यांनी केले.या शिबिरास प्राचार्य, प्राध्यापक वृंध व शिक्षेकेत्त कर्मचारी मेहनत घेत आहेत.

Copyright ©