यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

*सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न*

 

  •         विश्वकर्मामय विकास मंडळ वडगाव रोड यवतमाळ यांच्या वतीने प्रभू विश्वकर्मा जयंती सांस्कृतिक भवन हनुमान नगर वडगाव रोड यवतमाळ येथे साजरी केली त्यामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला.
    यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम जोहरकर , देवेंद्र राजुरकर , विठ्ठलराव चांदुरकर, संजय ईश्वरकर, केशव सवळकर, उपस्थित होते.
    कार्यक्रमाची सुरुवात प्रभू विश्वकर्माच्या प्रतिमा पूजन करून झाली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष कैलाश गव्हाणकर यांनी केले तसेच समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना तंबाखू मुक्त जिवनाची शपथ दिली.
    त्यानंतर २०२१ च्या परिक्षेत १० वी आणि १२ वी मध्ये ७५% चे वर गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला.
    यामध्ये वर्ग १२ वी मधुन सर्व प्रथम सुनिकेत कैलाश गव्हाणकर ९५.१७% , त्यानंतर क्रमशः अपर्णा रमेश पांडे ९५% , अनन्या नरेंद्र रोडे ९२.३३% ,अवंतिका रमेश दर्वेकर ८७.५०% , समृद्धी श्रीहरी ओलोकार ७८.५०% ,वैष्णवी गणेश कवळकर ७६.८३% ,राधिका बंडू कोळमकर ७६.६२% तर इयत्ता १० वी मध्ये सर्वप्रथम साक्षी शिवाजी खोलगडे ९७.४०% , त्या नंतर क्रमशः मनिष पंडीतराव जोहरकर ९३.००% ,कार्तिक विजय देऊळकर ९०.८०% ,क्षितिज मोहनराव अटाळकर ८५.८% , तनुश्री सुनील कोळवणकर ८४.८०% , पल्लवी विजय इंगळकर ८२.२०% , युवराज मोरेश्वर इंगळकर ७८.६० %
    यांचा सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वनश्री अटाळकर व श्रीमती सुनीता बानोकर यांनी केले
    तर आभार प्रदर्शन मोहनराव अटाळकर यांनी केले.
    कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अशोक बामरटकर, राजेश राऊत डेकर,संजय रोडेकर,बंडु ईश्वरकर,दिलीप साऊरकर,किशोर दवळकर, नरेंद्र रोडे, गणेश कुमकर, रविंद्र रामेकर,राजु अवजेकर, गणेश लाठेकर, ज्ञानेश्वर रुईकर, निळकंठ बोरेकर ,गजानन सेलुकर, कैलास खोलगडे आणि अनेक कार्यकर्ते व समाज बांधवांनी प्रयत्न केले.
Copyright ©