Breaking News राजकीय

*वाटखेड ग्रामपंचायत सरपंच यांचा मनमानी कारभार ग्रामवाशी त्रस्त*

  • वाटखेड ग्रामपंचायत सरपंच यांचा मनमानी कारभार ग्रामवाशी त्रस्त
    ग्रामस्थांना मिळतंय पेट्रोल डिझेल च्या दरात पाणी

प्रतिनिधी धीरज शेरकर

यवतमाळ तालुक्यातील वाटखेड येथील ग्रामस्थांच्या खिशाला कात्री लावल्याने ग्रामवाशी त्रस्त झाले आहे,येथील ग्रामस्थांना मिळतंय पेट्रोल डिझेल च्या दरात पाणी गेल्या दोन महिन्यांपासून नळाच्या करात मोठी वाढ करण्यात आली असल्याने वाटखेड पुन्हा या प्रकरणात चर्चेत आले आहे पाणी कर तब्बल पन्नास टक्के वाढ केल्याने गावकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले प्रथमच गावात योग्य ते सोय सुविधा तर नाहीच भ्रष्टाचाराची कीड या ग्रामपच्यायतीला लागली, नजर टाकली तिथे समस्या चे भांडार दिसते, गावातील नाल्या नाही एक रस्ता दोन वेळा केल्या जातो गावातील जिल्हा परिषद शाळेच्या समोर परिसरात घानेचे साम्राज्य पसरले आहे,विद्यार्थ्यांना नाक दाबून शाळेत जावे लागते ग्राम पंचायत सरपंच सदस्य यांचे गावातील समस्या कडे दुर्लक्ष मात्र पैशा कडे 100% टक्के या कडे लक्ष दिसुन येत आहे पाणी प्यायचे किती वापरायचे किती असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे
ग्राम पंचायत सरपंच सदस्य यांच्या हलगर्जी पना मुळे नळ पाणीपुरवठा ग्राम पंचायत ने शंभर रुपये हप्तात वाढ केल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहे येथील ग्रामपंचायत ग्रामस्थांवर एक प्रकारची हुकूम शाही सुरू केल्याचे बोलल्या जात आहे.

Copyright ©