यवतमाळ सामाजिक

महाराजस्व अंतर्गत विविध प्रमाणपत्र चे वाटत

महाराजस्व अंतर्गत विविध प्रमाणपत्र चे वाटत

______________________
किन्ही(वळगी) मा जिल्हा अधिकारी यांच्या आदेशा ने महाराजस्व अभियान अंतर्गत उपविभागीय अधिकारी दारव्हा सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार कार्यालय दारव्हा आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मा माणिकरावजी ठाकरे प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा दारव्हा येथे तालुका प्रशासनाच्या वतीने कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या मध्ये पाच शाळेचा सहभागी होत्या. पाच शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत विविध प्रकारच्या प्रमाणात वाटप करण्यात आले यामध्ये जात प्रमाणपत्र. व तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजने मार्फत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप. शिधापत्रिका. तसेच आदिवासी आश्रमशाळा दारव्हा येथे विद्यार्थ्यांचे कोव्हिड लसीकरण करण्यात आले. कार्यक्रम चे अध्यक्ष सुधीर पाटील उपविभागीय अधिकारी साहेब यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षे विषयी मार्गदर्शन केले तसेच सामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे महत्त्व पटवून दिले. तर प्रमुख पाहुणे सुभाष जाधव तहसिलदार साहेब यांनी विद्यार्थ्यांना कोविड व लसीकरणा विषयी मार्गदर्शन केले कार्याक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये जयेद्र बन नायब तहसीलदार.प्रकाश खाटीक निवासी नायब तहसीलदार. तुपसुंदरे साहेब नायब तहसीलदार.राजेश शिंदे गटविकास अधिकारी प स दारव्हा.विलास जाधव गटशिक्षणाधिकारी.कापडे साहेब अन्न पुरवठा निरीक्षक. आर एच गजभिये साहेब.विनोद निमकर.डॉ चावके. महंमद के ए माध्यमिक मुख्याध्यापक.सुरेश बोरखडे प्राथमिक मुख्यापक. कार्यक्रम चे प्रास्ताविक अजय ठाकरे.सुत्रसंचलन चेतन दरेकर.तर आभार कु सिमा धुळे मॅडम यांनी मानले तर कार्यक्रम यशस्वीते साठी शिक्षक काळेसर.पारधीसर.जाधवसर. ठाकरे सर. कु चक्रनारायन मॅडम. कु खाडे. बुलकुले सर .धवनेसर या शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Copyright ©