Breaking News यवतमाळ

दारू विक्रेत्या चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

सागर मुडे प्रतिनिधी पांढरकवडा

दारू विक्रेत्या चार आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

स्विप्ट वाहनासह 24 पेट्या देशी दारू असा 3,69,120/रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

पांढरकवडा पोलीस पेट्रोलिंग करीत असता 04/30 वा सुमारात स्विप्ट वाहन क्रमांक MH 29AD3206 ने यवतमाळ येथुन करंजी येथे अवैद्यरीत्या देशी दारूची वाहतुक होत असल्याची खबर मिळाल्याने, सदरची माहीती ठाणेदार जगदिश मंडलवार साहेब यांना देवुन संपुर्ण स्टॉफसह खबरे प्रमाणे सुरज लोहकरे याचे शेतातील फार्म हाऊस जवळ सापळा रचला असता सकाळी 05/30 वा सुमारास एक पांढरे रंगाची स्विप्ट वाहन क्रमांक MH 29AD3206 शेतात येवुन थांबली त्यातुन दोन ईसम उतरून सुरज लोहकरे यांच्या मदतीने दारू पेट्या उतरवित असता आजुबाजुला पोलीस असल्याची त्यांना कुनकुन लागताच सुरज लोहकरे तेथुन पळुन गेला तर वाहनातील दोन ईसम सुध्दा वाहन घेवुन पळुन गेले दरम्यान त्यांचा पाठलाग केला असता स्विप्ट वाहन शेतातील फार्म हाऊस जवळ फसल्याने वाहनातील आरोपी वाहन सोडुन पळुन गेले त्या पैकी आरोपी वाहन चालक संतोष अर्जुन पुरी वय 29 वर्ष यास पाठलाग करूण ताब्यात घेतले असुन त्याचा साथीदार आकाश उर्फ बारक्या रा.डोर्ली व सुरज लोहकरे पळुन गेले असुन त्यांचा शोध घेणे सुरू आहे. आरोपीस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपी संतोष अर्जुन पुरी वय 29 वर्ष हा विजय दुमोरे रा.डोर्ली याचेसाठी काम करीत असुन विजयचे सांगण्यावरून त्याचे स्विप्ट वाहन क्रमांक MH 29AD3206 ने करंजी येथील सुरज लोहकरे यास देशी दारू पोहचवित असल्याची कबुली दिली.
आरोपी संतोष अर्जुन पुरी वय 29 वर्ष रा.गीरी नगर यवतमाळ याचे ताब्यातील स्विप्ट क्रमांक MH 29AD3206 वाहनातुन 17 देशी दारू बॉक्स व लोहकरे याचे शेतातुन 7 देशी दारू बॉक्स असे एकुण 1152 पव्वे किंमत प्रती 60/- रू प्रमाणे 69,120 रू चे व स्विप्ट क्रमांक MH 29AD3206 जुनि वापरती किंमत 3,00,000/-रू ची असा एकुण 3,69,120/- रू चा जप्त करून चारही आरोपी विरूध्द अप नं.238/2022 कलम 65(अ)(इ) 81 महाराष्ट्र दारूबंदि कायदा कलम 279,34 भा.द.वि.सह कलम 183 मो.वा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ मार्गदर्शनात ठाणेदार जगदिश मंडलवार पोलीस स्टेशन पांढरकवडा, पो.उप.नि.संदिप बारिंगे, पो.हवा.प्रमोद जुनुनकर, ना.पो.का. उमेश कुमरे, मारोती पाटील, पो.का.शशिकांत चांदेकर, राजु बेलेवार, छंदक मनवर यांनी केली.

Copyright ©