शैक्षणिक

*सुसंस्कार विद्या मंदिरामध्ये चिमुकल्यांचे उत्साहात स्वागत*

 

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा 20 महिन्यांनंतर पुन्हा गजबजल्या. सुसंस्कार विद्या मंदिराच्या नर्सरी,केजी १,केजी२ची शाळा आजपासून सुरू झाली. घंटा खणाणली आणि पाठीवर दप्तर घेऊन चिमुकल्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने शाळेत प्रवेश केला. फुलांचा वर्षाव,करित त्यांचे स्वागत केले गेले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पायघडय़ा अंथरल्या गेल्या होत्या. दुतर्फा रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या. बॅण्डच्या संगीतात गीत गाऊन विद्यार्थ्यांवर पुष्पवर्षाव केला गेला. मुलामचे आवडते मिकीमाउस,आणि डोरेमँनही त्यांच्या स्वागतासाठी त्यांना खाऊ घेऊन आले होते. पहिल्या दिवसाची सुरुवात अशी अविस्मरणीय झाली.
चिमुकल्यांनी विद्यार्थ्यांनी दीड वर्षानंतर शाळा प्रत्यक्ष पाहिली. नेहमी ऑनलाइन वर्गात दिसणारे चेहरे समोरासमोर आले. खूप दिवसांनंतर शिक्षक, मित्र मैत्रिणींची भेट झाल्याने लहानग्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. शाळेत प्रवेश करताच त्यांनी शिक्षकांना नमस्कार केला. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत त्यांनी वर्ग गाठला.
शाळा सुरू होणार म्हणून वर्गांची आणि परिसराची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. वर्गात आल्यानंतर गोंधळ घालण्याचा अनेकांचा मूड होता, पण त्याचबरोबर कोरोना प्रतिबंधक नियमांचे बंधन असल्याने शिक्षक करीत असलेल्या सूचनांचे पालन करताना विद्यार्थी दिसत होते. वर्गांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचीही काळजी घेण्यात आली होती.
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही धरला ठेका

पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही विविध
बालगीतांवर ठेका धरला. दररोज डिजिटल माध्यमासमोर बसून आभासी शाळा अनुभवणारे विद्यार्थी आज शारीरिक हालचाल करून जागेवरच उभे राहून नाचत-बागडत होते. कोरोना प्रतिबंधक नियमांमुळे शाळेत सामूहिक खेळांवर बंदी असली तरी विविध गाण्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यायामही झाला. काही शाळा दररोज वर्ग सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी असे उपाय करणार असे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.उषा कोचे म्हणाल्या आहे. शेवटी मुलांना भेटवस्तु व खाऊ देण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शाळेचा शिक्षकवर्ग,शिक्षकेतर कर्मचारी ह्यांचा सहभाग लाभला.

About the author

Patrakar Shakti

Add Comment

Click here to post a comment

Featured

Copyright ©