Breaking News सामाजिक

*मुबारक तंवर व जगताप यांच्या आमरण उपोषणाला सुरुवात*

सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरण

सावळी सदोबा : आशीफ खान
सावळी सदोबा परिसरातील सिद्धेश्वर ( दातोडी ) गुप्तधन प्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर व दातोडी तंटामुक्त गावचे माजी अध्यक्ष गणपतराव पाटील जगताप यांनी सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जवळपास चार ते पाच वेळा निवेदने दिली परंतु या प्रकरणात कोणतीही चौकशी न झाल्याने अखेर 2 मार्च 2022 बुधवार पासून मुबारक तंवर व गणपत पाटील जगताप यांनी सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे.
सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणाला तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी वेगळीच दिशा दिल्याने त्यांच्यावर गुन्हे नोंद करून त्यांचे निलंबन करावे या मागणीसाठी उपोषणास सुरुवात केलीआहे.
आम्ही केलेली तक्रार जर चौकशीत खोटी आढळली व पोलिसांची दिशाभूल करणारी किंवा पोलीसांची बदनाम करणारी जर सिद्ध झाल्यास आम्हा दोघावरही कठोर कारवाई करावी अशी मागणी गणपत पाटील जगताप व मुबारक तंवर यांनी शंभर रुपयाच्या प्रतिज्ञापत्रावर लेखी स्वरूपात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेकडे दिलेले आहे .
आज पासून सुरू झालेल्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सावळी सदोबा गावच्या सरपंच अंजनाताई गेडाम , माजी सरपंच शेषराव मुनेश्वर , माळेगाव तंटामुक्त गावचे अध्यक्ष सुनील चव्हाण ,कृष्णनगर तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष संजय राठोड , केळझर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच किसन नाईक चव्हाण, गणपत जाधव,दातोडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच केशव मेश्राम, सुभाषनगर ग्राम पंचायत चे सदस्य प्रदिप कनाके, पळशी ग्राम पंचायत चे सदस्य लहु चव्हाण, केळझर ग्रामपंचायतचे सदस्य इंद्रसिंग चव्हाण ,भिमराव बनकर इत्यादींनी या आमरण उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला.

Copyright ©