सामाजिक

*दिग्रस येथील मोक्षधाम मध्ये महाशिवरात्र उत्सवात साजरी*

 

*मोक्षधाम मध्ये गुंजला ‘हर हर महादेव’चा गजर*

*सदानंद जाधव* दिग्रस

‘हर हर महादेव’च्या जयघोषात मोक्षधाम मधील शिवमंदिरात मंगळवारी (दि. १) पहाटेपासूनच महाशिवरात्री निमित्त पूर्जाअर्चा करून दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रांवर बंदी लादली असतां मात्र पूजाअर्चा करण्यास परवानगी दिली असल्याने शहरातील व शहराबाहेरील शिव मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाशिवरात्री हा भारतातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण. हा दिवस आनंदात साजरा केला जातो. अध्यात्मिक, वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महाशिवरात्री महत्त्वाची मानली जाते.
महाशिवरात्री निमित्त शहरातील व शहराबाहेरील सर्वच प्रमुख शिव मंदिरांमध्ये ‘हर हर महादेव’चा गजर सुरू झाला. भाविकांनी सकाळपासूनच मलिकार्जुन महादेव मंदिर,पालेश्वर महादेव मंदिर, कर्णेश्वर महादेव मंदिर,भवानी माता मंदिर परिसरातील शिवटेकडी या सह शहर परिसरातील विविध शिव मंदिर गाठून मनोभावे पूजाअर्चा करून मंगलमय कामना केली. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रमाणात गर्दी दिसून न पडणाऱ्या मोक्षधाम मधील मंदिरामध्ये दर्शनासाठी मात्र यंदा भाविकांच्या रांगाच-रांगा लागलेल्या दिसून आल्या. मोक्षधाम येथील देवाधिदेव महादेव चे दर्शन घेऊन येणाऱ्या प्रत्येक भाविकांच्या मस्तकी शिव भस्म व चंदन टिळ्याने लक्ष वेधले

Copyright ©