यवतमाळ शैक्षणिक

लाडखेड मराठी शाळेत कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती साजरी

लाडखेड प्रतिनिधी अन्सार खान

लाडखेड मराठी शाळेत कर्मयोगी संत गाडगेबाबा जयंती साजरी
प.सं.दारव्हा अंतर्गत जि.प.प्रा.म.कें.शाळा,लाडखेड येथे स्वच्छतेचे पुजारी  कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची १४६ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोलजी तायडे हे होते.तर प्रमुख अतिथी शाळेचे जेष्ठ शिक्षिका सिंधुताई दुधे,प्रणिता मोरे होत्या.
सर्व प्रथम संत गाडगेबाबा  यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
डेबुजी झिंगरुजी जानोरकर आज कर्मयोगी संत गाडगेबाबा या नावाने ओळखले जातात. महाराष्ट्रात
ग्रामस्वच्छता अभियान त्याच्या नावावर राबविण्यात आले आहे.
असे प्रतिपादन प्रणीता मोरे यांनी केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी गाडगेबाबा यांच्या जिवनावर भाषणे झाली.त्याच बरोबर विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली.
यावेळी सुत्रसंचलन शिल्पा काळे तर आभार सुनीता नासरे यांनी केले.
यावेळी शाळेतील शिक्षिका अनुराधा कराळे, प्राजक्ता दुधे यांनी सहकार्य केले.

Copyright ©