Breaking News यवतमाळ

भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाचा कारभार भारी,1000 रुपयाची लाच घेतली म्हणून करावी लागली कारागृहाची वारी

भूमी अभिलेखच्या उपअधीक्षकाचा कारभार भारी,1000 रुपयाची लाच घेतली म्हणून करावी लागली कारागृहाची वारी

भांबराजा येथील भूमापन क्रमांक 180 दुकानाच्या फेरफाराची प्रत देण्याकरिता या कामाचा मोबदला म्हणून आरोपी विजय शेषराव बावणे वय (46)वर्ष परीक्षण भूमापन कार्यालय उपअधीक्षक भूमी अभिलेख यवतमाळ .यांनी तक्रारदाराला कामाचा मोबदला म्हणून एक हजार रुपये लाच मागितली याबाबतची तक्रार संबंधित व्यक्तीने यवतमाळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली त्याबाबत प्रत्यक्षात पडताळणी करण्यात आली असता.कर्मचारी विजय बावणे याने एक हजार रुपय लाच स्वीकारल्याचे पंचासमक्ष मान्य केले व तहसील कार्यालय परिसरातच असलेल्या भुमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक विजय बावणे यांनी तक्रार दाराकडे तहसील कार्यालयासमोर असलेल्या महालक्ष्मी आईस्क्रीम लस्सी सेंटर जवळ ए.सी.बी कार्यालयाच्या अगदी बाजूला त्याने एक हजार रुपयांची लाच घेतली असता त्याला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.ही कार्यवाही शैलेश सपकाळ पोलीस उपाधिक्षक ला. प्र .वि .यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर नालट, जमादार ज्ञानेश्वर शेंडे, एम पी सी कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन भोयर ,महेश वाकळे , लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय यवतमाळ यांनी केली त्यानंतर आरोपी विजय बावणे यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनला आलेल्या तक्रारीवरून त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर आरोपीला रात्री पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे

Copyright ©