यवतमाळ शैक्षणिक सामाजिक

अंजी (नृसिंह) येथे तालुकास्तरीय साहित्य प्रदर्शनी संपन्न

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

अंजी (नृसिंह) येथे तालुकास्तरीय साहित्य प्रदर्शनी संपन्न

———————————————
आदर्श जि.प.किन्ही शाळा ठरली सर्वोत्कृष्ट
———————————————
घाटंजी-जि.प.शाळा अंजी (नृ.) येथे निपुण भारत अभियान अंतर्गत भाषा व गणित विषयाचे शिक्षक आणि विद्यार्थी द्वारे स्वनिर्मित शैक्षणिक साहित्याचे तालुकास्तरीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहणे यांचे हस्ते प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी राजूभाऊ शुक्ला,स्वप्निल मंगळे, विस्तार अधिकारी विजयाताई वैद्य केंद्रप्रमुख, सुनिल बोंडे, छायाताई बन्सोड, रवी आडे, किशोर मालविये, किन्ही येथील उ.श्रे.मुख्याध्यापक तथा जि.प.कर्मचारी पतसंस्थेचे संचालक गौतम कांबळे,सुधाकर वांढरे,विठ्ठल राठोड, उपस्थित होते.
संख्याज्ञान,संख्यावाचन, बेरजेची चक्की, चित्र व शब्द सहसंबंध, शब्दशिडी,आदी दृक साहित्याचे विद्यार्थ्यानी उत्कृष्टपणे सादरीकरण केले. सहभागी शाळेपैकी भाषा विषयाच्या साहित्य प्रदर्शनात प्रथम किन्ही,द्वितीय मनोली तर तृतीय तिवसाळा तसेच गणित विषयात प्रथम किन्ही,द्वितीय मनोली तर तृतीय क्रमांक चिंचोली (कोपरी) शाळेने पटकाविला. या शाळांना जिल्हा स्तरावर साहित्य प्रदर्शनीमध्ये सहभाग घेण्याकरिता संधी मिळणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी चंद्रप्रकाश वाहने यांनी जाहीर केले.
गणित विषयाचे मानव लढे व भाषा विषयाचे श्रीकांत पायताडे यांनी परिक्षण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाष्कर वेट्टी, संचलन प्रेमदास राठोड तर आभार किरण चिखलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राजू शेंडे, अश्विनी नारायणे यांनी परिश्रम घेतले.

Copyright ©