यवतमाळ सामाजिक

पारधी समाज राज्य संघटक भोसले कडून योगा पट्टू विजय राठोड यांचा सत्कार.

पारधी समाज राज्य संघटक भोसले कडून योगा पट्टू विजय राठोड यांचा सत्कार.

———————————————
आर्णी, नेर, घाटंजी तालुक्यातील बेड्याना देणार भेटी

———————————————
यवतमाळ-पुणे जिल्ह्यातील असलेले पारधी समाज राज्य संघटक नामदेव भोसले यांना घाटंजी तालुक्यातील एका छोट्याश्या रघुनगर बेड्यावरील पारधी समाजातील युवकाने योगगुरु बाबा रामदेव यांचे समवेत योगाचे धडे गिरवून आपल्या समजातील तरुणांसह इतरही युवक वर्गांना एक प्रेरणा दिली याची दखल घेत घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनिष दिवटे व परवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत योगा पट्टू विजय राठोड यांच्या आई वडिलासमवेत सत्कार करण्यात आला.
पारधी समाजातील बांधवांसाठी कार्य करतांना नामदेव भोसले यांनी महाराष्ट्रातील हजारो पारधी युवकांना गुन्हेगारी जगतातून मुक्त केले आहे. पारधी समाज व पोलीस यामध्ये असणारी चोर पोलीस ही दरी कमी करण्यामध्ये भोसले यांचा मोलाचा वाटा आहे. एवढेच नाही तर ते महाराष्ट्रातील पारधी बेड्यावर जावून पारधी समाज बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेवून ते सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात.
हिच बाब हेरून यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा पारधी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असल्याने जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, पोलीस अधिकारी गोकुळ पाटील, प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते पारधी समाज राज्य संघटक नामदेव भोसले यांच्या उपस्थित यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, नेर व घाटंजी तालुक्यातील पारधी बेड्यावर प्रत्यक्ष जावून तेथील समाज बांधवांची आजची स्थिती काय? तो कसा जिवन जगत आहे. याबद्दल माहिती संकलन करणार आहेत. आणि समाज बांधवांना प्रबोधनकार ठाकरे यांच्या वाणीतून मार्गदर्शन करणार आहे. या भेटीत समजातील तरुण पिढीला व विद्यार्थी व विद्यार्थिनीं मध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यातूनच त्यांनी सर्व प्रथम घोटी ग्राम पंचायतीतील रघुनगर येथिल योग पट्टू विजय राठोड ह्या युवकाचा आई वडिलांसह शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी घाटंजी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनिष दिवटे, पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनोद चव्हाण, सहाय्यक फौजदार रामकृष्ण चौके, घोटी तंटा मुक्ती अध्यक्ष अरविंद राठोड, माजी उपसरपंच धनराज पवार, देविदास आडे, मानसिंग राठोड यांचे घोटी परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

Copyright ©