यवतमाळ सामाजिक

विधी सेवा समितीचा उपयोग नागरिकांनी करावा-न्यायाधिश एफ. टी. शेख

कार्यकारी संपादक राजू चव्हाण

विधी सेवा समितीचा उपयोग नागरिकांनी करावा-न्यायाधिश एफ. टी. शेख

———————————————
घाटंजी-मा. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या आदेशान्वये विधी सेवा समितीची स्थापना प्रत्येक तालुक्यात करण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग जनतेने घ्यावा असे आवाहन
तालुका विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा दिवाणी न्यायालय न्यायाधीश, न्यायदंडाधिकारी एफ.टी.शेख यांनी केले आहे. ते पारवा पोलीस स्टेशन येथे आयोजित तालुका विधी सेवा समिती तथा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक ज्ञानदान शिबिर, जातीय सलोखा व शांतता बैठक या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

ते समोर म्हणाल्या की, गावातील गोरगरीब, मजूर वर्ग, व इतरांना त्यांचे हक्क अद्यापपर्यंत माहीतच नाही. त्यांना न्यायालयासाठी खर्च लागतो याची भीती त्यांना नेहमी सतावत असते. त्यामुळे सदर लोक न्यायालयाची पायरी चढत नाही. मात्र मा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी वकील देण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे. सदर काम तालुका विधि सेवा केंद्र अंतर्गत केल्या जाते. त्यामुळे जनतेने विधिसेवा चा केंद्राचा उपयोग करावा तरच सदर शिबिर संपन्न झाल्याचे समाधान वाटेल असे म्हणून सदर शिबिर आयोजित करण्यासाठी पारव्याचे ठाणेदार विनोद चव्हाण यांना त्यांनी धन्यवाद दिलेत. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून सतिष उमरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग अमरावती), पारवा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अनंतकुमार पांडे, ऍड खान, यवतमाळ येथील युनिक ॲकॅडमी चे सचिन राऊत, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेंद्र देवतळे, अरुण कांबळे, पांडुरंग निवल, संजय ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी घाटंजी वकील संघाचे तालुका अध्यक्ष अनंतकुमार पांडे यांनी वयोवृद्ध नागरिक व त्यांच्या अधिकार याविषयी आपण आपले मत व्यक्त केले. अड. खान यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच अरुण कांबळे यांनी बालकांचे कायदे, हक्क, अधिकार व बालविवाह बाबत माहिती दिली.
सतिष उमरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक लाचलुचपत विभाग अमरावती) व यवतमाळ येथील युनिक ॲकॅडमी चे सचिन राऊत यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भवितव्या मध्ये स्पर्धा परीक्षेसाठी करण्यात येणाऱ्या तयारीसाठी यथायोग्य मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक उर्जा प्रदान केली.

ग्रामीण भागातील जनतेला कायद्याची माहिती व्हावी त्यांच्यात कायद्याविषयी जनजागृती व्हावी या उदांत्त उद्देशातून तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन मध्ये कायदेविषयक ज्ञानदान मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी वन्यजीव प्रमुख विवेक येवतकर, कनिष्ठ अभियंता एमएसईबी पारवा व त्यांचे सहकारी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील बालक, एकल महिला, शेतकरी, शेतमजूर वंचित कुटुंब मजूरदार वर्गाची परिस्थिती हलाखीची असते. आणि त्यांचे एखादी प्रकरण न्यायालयात दाखल झाले की त्यांनी घाबरून जावू नये. अन्याय ग्रस्त याविरोधात न्याय मागण्यासाठी न्यायालयात वकिला मार्फत प्रकरण दाखल करावे लागते. परंतु ज्यांची परिस्थिती नाही, व वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत आहे अश्यांच्या नातेवाईकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना न्याय विभागाकडून ५० हजार रुपये ते तीन लाख रुपयांपर्यंत सहाय्य करून न्यायालया मार्फत वकील मिळवून दिल्या जाते. याची माहिती प्रसंगी देण्यात आली. शिवाय काही किरकोळ प्रकरणे सुध्दा भिती पोटी तसेच राहतात. मात्र न्यायालयात अश्या नागरिकांनी न्यायालयात अर्ज दाखल केल्यास त्यांना मोफत मार्गदर्शन केले जाते. यातून आपसी समझोता सारखे प्रकरनाचा निपटारा होवू शकते. माहिती अधिकार याबाबत माहिती दिली या सर्व न्याय विभागाने राबविलेल्या विविध योजनेचा लाभ घेतला पाहिजे अश्या सूचना प्रसंगी करण्यात आल्या.

शाहिद जवान ज्ञानेश्वर आडे यांच्या पत्नीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पारधी समाजातील युवक विजय राठोड यांनी योगासनाने सर्वांचे मन जिंकले त्यांचा ही न्यायधीश मॅडम तर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पारवा पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार व गृहरक्षक दल यांचे सहकार्य लाभले.
…….

क्राईम विरहित ग्राम तेथे ग्रंथालय.
ठाणेदार- विनोद चव्हाण

आज झालेल्या शांतता व सलोखा समितीच्या बैठकीमध्ये पारवा स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी क्राईम रेट कमी झाल्याचे सांगितले. सोबतच यानंतर ज्या गावात क्राईम कमी असेल किंवा होणार नाही, अशा गावात ग्रंथालयाची स्थापना करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना दाद दिली.

Copyright ©