यवतमाळ सामाजिक

शांतता समितीची सभा संपन्न

शांतता समितीची सभा संपन्न

आज यवतमाळ येथे शांतता समितीची सभा घेण्यात आलाय.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांचे स्वागत शांतता समिती जिल्हा सदस्य जावेद अली काझी यांच्या हस्ते करण्यात आले.ही बैठक आगामी धार्मिक कार्यक्रम, सन, उत्सव याकरिता घेण्यात आली होती.यामधे प्रामुख्याने शिवजयंती, महाशिवरात्री, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,रमजान ईद असे वेगवेगळे कार्यक्रम समोर येणार आहे त्या दृष्टीकोनाने आज पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी हि सभा आयोजित केली होती. शिवजयंती हि तर साजरी झालीच पाहिजे पण त्याला काही तरी नियम, अटी आणि कोरोणाचे नियम पालन करून शिवजयंती साजरी करताना प्रामुख्याने सर्वधर्मसमभाव हा गुण सर्वप्रथम सर्वांच्या अंगी असले पाहिजे जेणेकरून सर्व.एक मेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा गुण डोळ्यासमोर ठेऊन कार्यक्रमाला कोणत्याच प्रकारचे गाल बोट न लागता सामाजिक तेढ निर्माण न होता कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवून पुढील
धार्मिक सण,उत्सव,जयंती साजरी करता येईल.अशा प्रकारे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ ,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव दरणे , तहसीलदार कुणाल झालटे ,उप विभागीय अधिकारी,बक्षी , नगरपरिषद मुख्याधिकारी माधुरी मडावी ,जेष्ठ पत्रकार न. मा.जोशी तसेच यवतमाळ ग्रामीण पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे ,गोपनीय शाखेचे नितीन जाधव, शहर पोलिस स्टेशन पोलीस निरीक्षक पंत साहेब, अवधूत्वडी पोलीस स्टेशन निरीक्षक मनोज केदारे , लोहारा पोलीस स्टेशन निरीक्षक भेंडे ,कळंब पोलीस स्टेशन निरीक्षक तथा शांतता समिती सदस्य व मुस्लिम युवा सेवा संघाचे जुबेर सैयद,जुनेद खान,रेहान खान,सोहेल भाई उपस्थित होते. शांतता समिती सभा घेण्यात आली या वेळी सर्वाँना एक संदेश देण्यात आली
सण,उत्सव ,जयंती सामाजिक कार्यक्रम साजरा करताना प्रामुख्याने या कार्यक्रमाला कोणत्याच प्रकारे गाल बोट न लागता सामाजिक तेढ नर्माण न होता कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून प्रत्येक कार्यक्रम यशस्वी पने राबविले पाहिजे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.

Copyright ©