यवतमाळ सामाजिक

गरजु रुग्णांसाठी धावून गेला खाकीवर्दीतील रक्तविर  यवतमाळ पोलीस यशवंत गिरी यांची मानवतेची प्रचिती

गरजु रुग्णांसाठी धावून गेला खाकीवर्दीतील रक्तविर
 यवतमाळ पोलीस यशवंत गिरी यांची मानवतेची प्रचिती

यवतमाळ:- मानवतेची सेवा करणारे जीवनदाते अशी रक्तवीरांची समाजात ओळख आहे. कुणाला रक्ताची गरज भासली तर दाते बनुन रक्तदानास तयार होणारे युवक काही कमी नाही. त्यातील एक आपल्या नियमित रक्तदानातून साक्षात मानवतेचे प्रतिबिंब उमटवणारे रक्तविर यशवंत गिरी यांनी काल पंधराव्यांदा रक्तदान केल आणि समाजात माणुसकीचा पायंडा घट्ट केला.
यवतमाळ पोलीस असलेले यशवंत गिरी यांनी रक्तदानाची कास धरली आणि त्यांनी रक्तविर होऊन आपल रक्तदान सुरू ठेवलं. श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रक्ताची अत्यंत गरज असलेल्या रमेश पुरी यांच्यासाठी रक्तदान केलं. यशवंत गिरी यांनी अत्यंत संवेदनशील वेळी आपल्या कर्तव्यावरुन त्यांनी रक्तदानासाठी वेळ दिला. पंधराव रक्तदान पार पाडल. यानिमित्तानं यावेळी रक्तपेढीचे माननीय गवारे सर यांच्या कडून रक्तदाते पोलीस यशवंत गिरी यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावेळी प्रफुल भोयर, सुनिल नलगंटीवार, मोनेश्वर खंडरे, चेतन राठोड, विशाल जाधव आणि इतर यवतमाळ पोलिस कॉप्स यांनी या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या.

Copyright ©