यवतमाळ राजकीय

शिवसेनेच्या निष्ठावाणाचे असेच बळी जानार का?

शिवसेनेच्या निष्ठावाणाचे असेच बळी जानार का?

सेनेच्या तालुका प्रमुखाचा तडकाफडकी राजीनामा झाल्याने शिवसेनेच्या निष्ठावाणाचे असेच बळी जानार का? असा सूर शिवसेनेच्या गटात उमटत आहे.

शिवसेनेचे मारेगाव तालुका प्रमुख संजय आवारी यांनी तडकाफडकी पदाचा व पक्षाचा राजीनामा जिल्हा प्रमुखाकडे सादर केल्याने सेनेत मोठी खळबळ उडाली आहे. परिणामी मारेगाव तालुक्यात सेनेला मोठे खिंडार पडत असल्याचे दिसुन येत आहे. आज पर्यंत निष्ठा वाणाचे असेच बळी घेण्यात आले

मारेगाव तालुक्यातील शिवसेनेचे लहानपणापासून सक्रिय कार्यकर्ते असलेले संजय आवारी यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्याकडे कौटुंबिक अडचणीमुळे पक्ष संघटन करण्यास असमर्थ असल्याचे कारण देत राजीनामा सादर केला आहे. कारण जरी दिले असले तरी नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. परिणामी अनेक कार्यकर्ते या निवडणुकीत नाराज असल्याचे बोलल्या जात आहे. यात जिल्हा स्तरावरून घडलेल्या घडामोडीत स्थानिक निष्ठावंत कार्यकर्ते दुरावल्या गेल्याची चर्चा आहे. यात भाजपा सोबत युती केल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचा सूर उमटला आहे. मागील काळात सेनेचा एक गट काँग्रेस मध्ये दाखल झाला होता. आता खुद्द तालुका प्रमुख संजय आवारी यांनी पक्षाचा व पदाचा राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्काना उधाण आले आहे.

Copyright ©