यवतमाळ सामाजिक

धानोरा येथील शेतकरी भूसंपादीत शेती च्या मोबदल्या पासून वंचित

धानोरा येथील शेतकरी भूसंपादीत शेती च्या मोबदल्या पासून वंचित

वडगाव जंगल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या धानोरा येथील शेतकरी लघु सिंचन तलाव प्रकल्प अंतर्गत कार्यालयाने भूसंपादीत केले या जमिनीचा नुकसान व आर्थिक मोबदला मिळण्या करीता प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 8 वर्षा पासून कार्यालयाचे हेलपाटे खात आहे तब्बल 8 वर्षाच्या प्रयत्नांनंतर शेतकऱ्यांचा भूसंपदानाच्या मोबदल्याची आकडेवारी तर समोर आली पण ज्या शेतकऱ्यांची जमिनीवर काम झाले त्यांना वगळून दुसऱ्याच शेतकऱ्यांना मध्यस्तीच्या सहाय्याने पैसे/चेक वाटप करण्याची तयारी दर्शवत आहे ज्या शेतकरी च्या जमिनीवर डॅम लाईन चे काम झाले आहे व ज्या शेतकरी च्या जमिनीवर काम होणार आहे चक्क त्या शेतकऱ्यांना वगळून भलत्याच शेतकऱ्यांना माध्यस्तीच्या साहाय्याने लाभ देण्याची इच्छा दाखवत आहे ज्या शेतकऱ्याच्या शेतात डॅम लाईन चे काम झाले आहे ते शेतकरी निव्वळ शेतीच्या भरोस्यांवर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते त्यांची जमीन लघु सिंचन तलाव मध्ये समाविष्ठ झाल्याने व त्यांचा मोबदला अजून पर्यंत न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे सध्या स्तिथी मध्ये डॅम लाईन चे काम फक्त शेतकरी अरुण नित यांच्याच शेतात झाले आहे मात्र उर्वरित शेतकऱ्यांचा शेतामध्ये डॅम लाईन चे काम झालेच नाही (शेतकऱ्याने काम करू दिले नाही) तरीसुद्धा त्यांचे पैसे कुठल्यातरी माध्यस्ती इसमाकडून शेतकऱ्यां कडून 20% घेऊन त्यांना रक्कम मिळण्याकरिता झटापट चालू आहे परंतु ज्या शेतकऱ्याला याचा मोबदला प्रथम मिळाला पाहिजे होता तो न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला असून संबंधित अधिकार्यांनी या कडे गांभीर्याने लक्ष घालून डॅम लाईन मधल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती शेतकरी करीत आहे

Copyright ©