यवतमाळ सामाजिक

सावळी सदोबा परिसरांमध्ये संत सेवालाल महाराज जयंती  उत्साहात साजरी

सावळी सदोबा आशिफ खान

सावळी सदोबा परिसरांमध्ये संत सेवालाल महाराज जयंती  उत्साहात साजरी

सावळी सदोब: आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील माळेगांव,चिंचबर्डी,बारभाई,सुभाष नगर,कृष्णनगर,ईचोरा,दहेली,वरूड,भ
नाईकनगर,पाळोदी,साखरातांडा,शिवरपळशी,सुधाकरनगर,सह बहुतांश गावांमध्ये बंजारा समाजाचे कुलदैवत असलेल्या संत सेवालाल महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली,
महाराष्ट्राच्या मातीला पराक्रमी शूरवीरांचा वारसा लाभलेला आहे तसेच या मातीमध्ये संतांच्या पवित्र विचारांचा सुगंध आज तागायत दरवळत आहे संतांचे विचार कोणत्याही जाती पुरते मर्यादित नसतात तर त्यांचे मार्गदर्शन भजन प्रवचन प्रबोधन किर्तन हे सर्व जनतेच्या जडणघडणीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरतात याच पावन भूमीमध्ये भटक्या जातीमध्ये जन्माला येऊन समाजाला जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवणारे ज्यांना बंजारा समाजाचे कुलदैवत मानले जाते,असे थोर समाज सुधारक जगद्गुरु सद्गुरु संत सेवालाल महाराज यांची 283 जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी बंजारा समाजातील महिला व पुरुष बंजारा वेशभूषा प्रदान करून आपापल्या गावातुन संत सेवालाल महाराज यांच्या पालखी ची मिरवणूक काढण्यात आली

Copyright ©