यवतमाळ सामाजिक

समभावाने काढला बाबा कंबल्पोष यांचा शाही संदल

 प्रतिनिधी सय्यद अक्रम

समभावाने काढला बाबा कंबल्पोष यांचा शाही संदल

आज आर्णी येथिल सर्वधर्म समभावाचे प्रतिक बाबा कंबलपोष* व बच्चु बाबा यांच्या संदल शरिफ चे आयोजन जुनी वस्ती हैदरी बंगला चौक FC परिसरातील तरुणांनी केली होती..
या संदल शरिफ मध्ये प्रत्येक ट्रँक्टर वर वेगवेगळया प्रकारचे बाबांच्या दर्ग्यावर चढविण्यात येणारया चादरीचे झांकी तयार करण्यात आले होते व
राम रहिम एक है गगन का रंग एक है
बदन का रंग कुछ भी हो लहु का रंग एक है
हे एकतेचा संदेश देत
प्रत्येक ट्रँकटर वर भगवे,हिरवे,निळे, झेंडे व बलुन डिझाईन बांधण्यात आले होते व संदल मध्ये हिंद व्यायाम शाळे तर्फे चित्तथरारक कार्यक्रम ज्यात लाठीकाठी,भाले, टेंबे, फिरविण्यात आले व तलवार बाजी करण्यात आली या संदलचे हैदरी बंगला परिसरातुन सुरवात होऊन विठ्ठल मंदिर जवळ विठुरायावर आरती वाजवुन, गणपती मंदिर जवळ गणरायांचे गित व प्रभु श्रीरामांचे गित वाजवुन, डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाजवळ बाबासाहेबांच्या जिवनावर आधारित गित वाजवुन, माहुर चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे वाजवुन तरुणांनी जल्लोष केला
सुरवाती पासुन तर शेवट पर्यत प्रत्येक गित,आरती,पोवाडे, कव्वाली, वर थिरकणारया तरुणांचा उत्साह कायम होता या संदल शरिफ मध्ये आर्णी नगरिचे माजी नगराध्यक्ष आरिज बेग साहेब यांची उपस्थिती उल्लेखनिय होती
संदल मध्ये महाराष्ट्र हाँटेल तर्फ पाणी पाऊच वाटप करण्यात आले
व शेवटी संदल शरिफ ची शांततेत यशस्वी सांगता करण्यात आली…

Copyright ©