यवतमाळ राजकीय सामाजिक

घाटंजी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शैलेश इंगोले यांची निवड

घाटंजी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शैलेश इंगोले यांची निवड
———————————————
घाटंजी -: गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य शैलीचा ठसा उमटविणारे तसेच समाजाचे युवा नेतृत्व असलेले,सामाजिक चळवळीत अग्रेसर राहुन सर्व सामान्यांच्या प्रश्नासाठी झटणारे शैलेश इंगोले यांची घाटंजी काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
शैलेश ईंगोले यांचे उल्लेखनीय पक्ष कार्य व राजकीय अनुभव लक्षात घेता,खा.सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर यांनी शिफारस केल्यावरुन त्यांची नियुक्ती यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे.
त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय जिल्ह्यातील सर्व जेष्ठ नेते तसेच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर,माजी मंत्री शिवाजीराव मोघे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष आ.डाॅ.वजाहत मिर्झा यांना दिले आहे.त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र कौतुक होत असुन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहे.

Copyright ©