यवतमाळ सामाजिक

कोरोना काळात शाळा बंद असल्याने भावी पिढी गारद होऊ नये. ग.शि.अ.वाहने यांचे आवाहन

 

 कार्यकारी संपादक राजू चव्हाण

कोरोना काळात शाळा बंद असल्याने भावी पिढी गारद होऊ नये. ग.शि.अ.वाहने यांचे आवाहन
———————————————
शिक्षक संघातर्फे गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार
——————————————–
घाटंजी- पंचायत समितीमध्ये नुकतेच रुजू झालेले गट शिक्षण अधिकारी श्री. वाहने यांचा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ६६६९तर्फे स्वागत व सत्कार करण्यात आला.या प्रसंगी शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्या वर साधक-बाधक चर्चा करण्यात आली. कोरोना काळामध्ये दोन वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे,नवीन पिढी गारद होऊ नये ही सर्व आपली जबाबदारी असल्याचे गटशिक्षणाधिकारी वाहने यांनी शिक्षकांना आवाहन केले. सोबतच शिक्षकांच्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. याप्रसंगी शिक्षक संघातर्फे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून शाळांना रंगरंगोटी, किरकोळ दुरुस्ती, वीज बिले भरण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत गटविकास अधिकारी सोनाली माडकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिपक महाकुलकर, सचिव संजय पडलवार,राजेश उदार,चंद्रकांत मुनेश्वर,,अनिल मस्के, नंदकुमार बुरबुरे,वसंत जाधव,मनोज गवळी यासह संघटनेचे सदस्य हजर होते.

Copyright ©